Satara Latest Marathi News 
सातारा

साताऱ्यात आरटीओ कार्यालयालगतच्या 12 टपऱ्यांवर पालिकेचा 'हातोडा'

गिरीश चव्हाण

सातारा : सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने आज आरटीओ कार्यालयाजवळील रस्त्यावर असणाऱ्या बारा टपऱ्या हटविल्या. टपऱ्या हटवित असतानाच या पथकाने मंगळवारी सातारा पालिकेच्या परिसरातील अतिक्रमणे हटविणार असल्याची माहिती दिली. 

साताऱ्याच्या विविध भागातील रस्त्यांलगत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात टपऱ्यांची अतिक्रमणे वाढली आहेत. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच अनेक गैरप्रकार वाढीस लागले होते. यामुळे ती हटविण्याची मागणी नागरिकांकडून पालिकेकडे करण्यात आली होती. यानुसार आज पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जेसीबी, डंपरच्या मदतीने सकाळी आरटीओ परिसरातील बारा टपऱ्या हटविल्या. 

या टपऱ्या हटविल्यानंतर त्याठिकाणी सफाई पालिका कर्मचाऱ्यांनी केली. पालिकेच्या वतीने मंगळवारी शाहू चौक, पालिका कार्यालय, शाही मस्जिद तसेच इतर प्रमुख मार्गांवरील टपऱ्या हटविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वर्दळीच्या रस्त्यावरील अतीक्रमणे हटल्याने या मार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी झाली होती. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT