Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

खटाव तालुक्यातील अवैध धंदे बंद करा; राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक

केशव कचरे

बुध (जि. सातारा) : ललगुण (ता. खटाव) येथे सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या तालुका कार्याध्यक्षा मुमताज मुलाणी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. गुन्हे दाखल करूनही संबंधितांकडून अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप मुलाणी यांनी निवेदनात केला आहे. 

याबाबत मुलाणी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुसेगाव-फलटण रस्त्यावर एक मंगल कार्यालय व लॉज असून, त्या परिसरातच एक हॉटेल आहे. तेथे कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जात नाहीत. हॉटेलच्या परवान्यावर केवळ दारू विकली जात आहे. मोकळ्या झालेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, ग्लास रात्री- अपरात्री जाळण्यात येतात. प्लॅस्टिक जाळल्याने त्याच्या येणाऱ्या उग्र वासाने परिसरातील लोकांना श्वसनाचे विकार जडण्याची शक्‍यता आहे. हॉटेलमधून दारू पिऊन बाहेर पडणारी मंडळी विक्षिप्त हावभाव करतात. लॉकडाउनमध्ये दारूचा व्यवसाय कधीही बंद नव्हता. 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या दारूबंदीच्या दिवशीही येथे दारू विकली जात होती. हॉटेलच्या मागे असलेल्या लॉजवरही अवैध प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील तरुण, तरुणी वाममार्गाला जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. परिसरात मद्यपींची वर्दळ असल्याने शिवीगाळ, भांडणाचे प्रकार सात्यत्याने होत असतात. 

परिसरातील लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लॉजवर रात्री-अपरात्री अनेक वाहनांची ये-जा असते. त्याच्या आवाजाचा व धुरांच्या प्रदूषणाचा प्रचंड त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे. याबाबत कोणीही तक्रार करण्यास धजावत नाही. याबाबत अनेकवेळा स्वतः पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर पुसेगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेनेही कारवाई केली आहे. परंतु, येथील अवैध व्यवसाय सुरूच आहेत. त्यांची मुजोरी अजून सुरू आहे. ही तक्रार केल्याने माझ्या व माझ्या परिवाराला धोका होऊ शकतो. या ठिकाणी सुरू असलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अन्यथा आंदोलन, धरणे, उपोषण या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना पाठवल्या आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT