Satara Latest Marathi News 
सातारा

कोळे-अंबवडे बंधाऱ्यावरील अपघातात आजीसह नातवाचा मृत्यू; विंगमध्ये वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

विलास खबाले

विंग (जि. सातारा) : विभागातील कोळे-अंबवडे पुलावरून होणारी वाहतूक तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आहे. वांग नदीवरील बंधारा वाहतुकीसाठी वापरला जात आहे. तांत्रिकदृष्टीने तेथून होणाऱ्या वाहतुकीचा विचार करता ही बाब पूर्णतः चुकीची आहे; परंतु बंधारा वाहतुकीचा प्रमुख मार्ग असल्याने तेथून मोठ्या प्रमाणात रहदारी होते. शनिवारी त्या बंधाऱ्यावर आजीसह नातवाचा अपघातात मृत्यू झाल्याने बंधाऱ्यावरील वाहतुकीचा प्रश्न अधोरेखित झाला आहे. बंधारा जरी वाहतुकीचा प्रमुख मार्ग असला, तरी त्यावर उपाययोजना आखल्यास भविष्यातील धोका टाळता येईल, हे नक्की. 

विभागातील मोठी बाजारपेठ असलेल्या कोळे येथून अंबवडे गावास जाता येते. दोन गावांच्या दरम्यान वांग नदीवर बंधारा आहे. साधारण 30 वर्षांपूर्वी पाणी अडविण्याच्या अनुषंगाने बंधारा उभारण्यात आला. बंधाऱ्यामुळे विभागातील शेतीस मोठा फायदा झाला. बंधारा पाणी अडविण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर बंधाऱ्यांवरून वाहतुकीचा मार्ग बनल्याने पाण्याच्या उपलब्धतेबरोबर रहदारी म्हणून बंधारा उपयोगी राहात आहे. वस्तुतः अंबवडेवरून कोळे येथे येण्यासाठी आणे गावामार्गे प्रमुख मार्ग आहे. मात्र, अंबवडे येथील लोकांना हा मार्ग लांब पल्ल्याचा ठरत असल्याने ते या मार्गाऐवजी बंधाऱ्यावरील वाहतुकीस प्राधान्य देत आहेत. वास्तविक बंधाऱ्यावरून वाहतूक करणे चुकीचे आहे. एकतर बंधाऱ्याची बांधणी वाहतुकीसाठी उपयुक्त नाही. मात्र, पर्यायी व जवळचा मार्ग म्हणून बंधाऱ्याचा वापर होतो. 

बंधाऱ्यावरील मार्गाचा विचार करता रहदारी चुकीची होत असताना दुसऱ्या बाजूला तेथील अपघाती क्षेत्र लक्षात घेता जीवघेणी परिस्थिती डोळ्यासमोर दिसते. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस मोठा उतार आहे. बंधाऱ्यावर कठडे नसल्याने आपसुकीस ते धोक्‍याचे आहे. पावसाळ्यात बंधाऱ्याच्या माथा भागाची दुरवस्था झाल्याने संबंधित विभागाने नुकतीच डागडुजी हाती घेतली आहे. याकरिता संबंधित ठेकेदारांनी वाहतूक बंद ठेवली आहे. असे असूनही लोक त्या बंधाऱ्यावरून वाहतूक करत आहेत. धोका डोळ्यासमोर दिसूनही जीवघेणी कसरत करत रहदारी सुरू आहे. शनिवारी सायंकाळी घडलेल्या अपघातामुळे तेथील वाहतुकीचा प्रश्न अधोरेखित झाला. खरेतर बंधाऱ्यावरून रहदारी करता येत नाही, तरीही होणारी वाहतूक सुरक्षित होण्यासाठी उपाययोजना आखण्याची तितकीच गरज आहे, हे नक्की. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT