Satara Latest Marathi News 
सातारा

फलटणात विनामास्क फिरणाऱ्या 48 जणांवर दंडात्मक कारवाई

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : शहरात मास्कचा वापर न करणाऱ्या, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून केलेल्या कारवाईद्वारे गत दोन दिवसांत 25 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

फलटण शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतो आहे. त्या अनुषंगाने गेल्या दोन दिवसांमध्ये प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भारत किंद्रे, अन्य पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पृथ्वी चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, तसेच बाजारपेठेमध्ये विदाऊट मास्क, सोशल डिस्टन्सिंगबाबत मोहीम राबविण्यात आली. 

या मोहिमेत गुरुवारी (ता. 18) मास्कविना फिरणाऱ्या 47 जणांकडून 7600 रुपये दंड घेण्यात आला, तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या आठ प्रकारातून 8000 रुपये दंड असा एकूण 15600 रुपये दंड आकारण्यात आला आहे. शुक्रवारी (ता.19) फलटण शहर पोलिस ठाणे हद्दीत प्रमुख चौकातून, तसेच बाजारपेठमध्ये मास्कविना फिरणाऱ्या 48 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून 9,600 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT