Satara Latest Marathi News 
सातारा

वर्णेतील जवानाच्या स्मरणार्थ धावला सातारा; स्पर्धेत 250 मुलांचा सहभाग

सूर्यकांत पवार

अंगापूर (जि. सातारा) : वर्णे (ता. सातारा) येथील भारतीय सैन्य दलातील आजी- माजी जवानांनी स्थापन केलेल्या भारतीय सेना ग्रुपने नुकतेच दिवंगत झालेले जवान सचिन काळंगे यांच्या स्मरणार्थ धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील 195 मुले, तर 55 मुलींनी सहभाग घेतला होता. 

ही स्पर्धा मुलींसाठी 800 मीटर, तर मुलांसाठी 1600 मीटर मुले अशा दोन गटांत पार पडली. मुलींच्या गटात वैष्णवी मोरे (कऱ्हाड) हिने प्रथम, तर धनश्री माने (मांडवे) व गौरी खिलारे (सोलापूर) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला, तसेच मुलांमध्ये श्रीधर सावंत (येतगाव, कडेगाव) याने प्रथम, तर विकास पोळ (फलटण) याने द्वितीय व राहुल जाधव (अंबवडे खुर्द) याने तृतीय क्रमांक मिळविला. 

स्पर्धेचे उद्‌घाटन दिवंगत जवानाच्या पत्नी अश्विनी सचिन काळंगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना (कै.) सुभेदार चंद्रकांत शंकर काळंगे यांच्या स्मरणार्थ चषक देण्यात आले. या वेळी गावातील अनुष्का दत्तात्रय कुंभार हिने राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ऑनररी कॅप्टन विकास पवार, सेना जवान वैभव पवार, समाधान काळंगे, पुरुषोत्तम कुंभार, गणेश सपकाळ, योगेश पवार, जितेंद्र पवार, अजित काळंगे, अनिकेत काळंगे, सचिन काळंगे, राहुल काळंगे आदींनी परिश्रम घेतले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Massajog Election: मस्साजोगमध्ये अश्विनी देशमुख यांचा पराभव का झाला? 5 मोठी कारणं; धनंजय देशमुखांची खरंच 'ती' चूक होती?

Prakash Awade Dhairyashil Mane: आवाडे- धैर्यशिल माने संघर्ष पेटणार, प्रकाश आवाडेंच्या वक्तव्यानंतर, भावी आमदार म्हणून माने समर्थकांनी डिवचलं

स्टार प्रवाहवर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, प्राजक्ता गायकवाडचं ५ वर्षानंतर कमबॅक, सोबतीला 'ही' अभिनेत्री

Budget Mobile : नवीन मोबाईल घ्या बजेटमध्ये! 20 हजारच्या आत टॉप 5G स्मार्टफोन्स; बेस्ट कॅमेरा, दमदार फीचर्स अन् बरंच काही

आमदारकीसाठी शिंदेंसोबत जाण्याइतका मी नालायक नाही, संधी दिली तर...; विधानपरिषद अन् विलीनीकरणावर बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT