Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

सातारा जिल्ह्यात 154 गावांत नळजोडणी पूर्ण; 'पाणीपुरवठा'कडून 11 कोटींचा निधी खर्च

प्रशांत घाडगे

सातारा : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कोरोनाच्या काळात खोळंबलेल्या योजना मार्गी लावण्यासाठी यंदा मार्च महिन्यापासून 11 कोटी 28 लाख निधी खर्च केला आहे. यामधून जिल्ह्यात मार्च ते डिसेंबर या कालावधीत 154 गावांत जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळजोडणी पूर्ण झालेल्या आहेत. 

यंदा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला विविध योजनांसाठी मार्च महिन्यापासून 13 कोटी 63 लाखांचा निधी आला होता. मात्र, कोरोनाच्या काळात मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरू झाल्याने गावोगावी सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजना व इतर ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यांची विविध कामे अपूर्ण राहिली होती. काही गावांमध्ये नळजोडणीअभावी पाण्याची गैरसोय झाली होती. अनेक ठिकाणी नळजोडणीची कामे अर्धवट राहिली होती. कोरोनाच्या संकटामुळे विकासकामे खोळंबल्याने मार्च महिन्यापासूनचा अखर्चित निधी मोठ्या प्रमाणात शिल्लक होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात लॉकडाउन शिथिल केल्यानंतर विविध योजनांसाठी निधी वापरण्यात येत आहे. यामधून ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 150 हून अधिक गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास गेल्या आहेत. 

दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबीयास दरडोई प्रतिदिवस 55 लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. ग्रामीण भागात सार्वजनिक शुध्द पाणीपुरवठा, शाश्‍वत पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागास विविध योजनांसाठी 23 कोटी आठ लाखांचा निधी आलेला होता. या निधीतून गेल्या वर्षी जिल्ह्यातील 59 योजना पूर्णत्वास गेल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली. 

कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण केली जात आहेत. यासाठी यंदा मार्च महिन्यापासून 13 कोटी 63 लाखांचा निधी प्राप्त झाला असून, त्या माध्यमातून योजना पूर्णत्वास नेल्या जात आहेत. 
-एस. एस. शिंदे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loose Oil Sale Maharashtra : मोठा निर्णय! देवेंद्र फडणवीसांकडून तुकाराम मुंढेंच्या आदेशाला केराची टोपली? सुटे खाद्यतेल विक्रीला परवानगी

एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, नागपूर-बंगळुरू विमानाचे उड्डाण वेळेवर रद्द, प्रवाशांचा गोंधळ, नेमकं काय घडलं?

Australia A Squad: 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी'आधी ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय;३५ वर्षीय खेळाडूला दिले भारत दौऱ्याचे तिकीट!

कर्जाचा तगादा, पतीसह पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; पलूस तालुका हादरवणारी घटना

FDA Action : ‘ब्लिंक कॉमर्स’चा परवाना निलंबित! अस्वच्छतेच्या त्रुटी कायम; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

SCROLL FOR NEXT