सातारा

कऱ्हाडला 30 मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे; हेल्मेट नसणाऱ्या 200 जणांवर कारवाई

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : सरत्या वर्षाला निरोप देताना नशेत वाहन चालविणाऱ्या तब्बल 30 जणांवर शहर वाहतूक शाखेने थेट गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर "ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह'अंतर्गत दोषारोपपत्र थेट न्यायालयात दाखल केले जाणार आहे. पहाटेपर्यंत वेगवेगळ्या चौकात कारवाई सुरू होती. त्यानुसार न्यायालयात खटले पाठवले जाणार आहेत. कालपासून अवजड वाहतुकीसह हेल्मेट नसणाऱ्यांवर केलेल्या कारवाई 150 घरांत गेली आहे. त्यांच्याकडून 50 हजारांचा दंडही वसूल केला.
 
सरत्या वर्षाला निरोप देताना नशेबाज वाहनचालक काल रात्री येथील पोलिसांच्या रडारवर होते. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी वेगवेगळ्या चौकासह रस्त्यावर थेट नाकाबंदी केली होती. त्यात दत्त चौक, कोल्हापूर नाका, कृष्णा नाका, कार्वे नाका, पाटण तिकाटणे फाटा, महामार्गावरील मलाकापूर फाटा, खोडशी फाट्यावर पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते. पहाटेपर्यंत वीसपेक्षा जास्त कर्मचारी तैनात होते. त्यांनी नशेबाज तीसहून अधिक युवकांसह नागरिकांवर कारवाई केली. त्यांच्यावर दारू पिऊन वाहन चालविण्याचा खटला भरण्यात आला आहे. त्यानुसार त्यांच्यावर ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह अंतर्गत दोषारोपपत्र ठेवण्यात येणार आहे. सरत्या वर्षाच्या सायंकाळपर्यंत पोलिसांनी अवजड वाहनांसह विना हेल्मेट दुचाकीवर रात्रीही कारवाई केली. 

सायंकाळअखेर 100 जणांवर कारवाई झाली होती. त्याची संख्या रात्री वाढल्याने 150 लोकांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून 50 हजारांचाही दंडही वसूल करण्यात आला आहे. त्यातील अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांवर गुन्हे दाखल होणार आहेत. मद्यपी वाहन चालवणाऱ्यांवर थेट न्यायालयात खटले भरण्यात येणार आहेत. वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. त्यामध्ये शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचेही सहकार्य घेण्यात आले. तेही कर्मचारी कारवाईत सहभागी होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT