Satara Latest Marathi News 
सातारा

तारळ्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा धडाका; पोलिसांनी कसली कंबर

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नियमांची कडक अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत व पोलिसांनी कंबर कसली असून विनामास्क कारवाईचा धडाका लावला आहे. या कारवाईचा सर्वसामान्य जनतेने धसका घेऊन मास्क वापरण्यास पुन्हा सुरुवात केल्याचे दिसते. 

नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यांत कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण कमालीचे घटले होते. परिणामी नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझर वापर कमी केला होता. काही जण कोरोना गेलाच, असे समजून कसलीच काळजी घेताना दिसत नव्हते. मात्र, गत पंधरवड्यात पुन्हा बाधितांची संख्या वाढू लागल्याने काळजी वाढली आहे. प्रशासनानेही सावध होत नियम कडक केले असून कारवाईचे आदेश दिले आहेत. 

त्यातच तारळे विभागात पुन्हा कोरोनाने डोके वर काढू नये म्हणून यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ढोरोशी व तारळेत पुन्हा बाधित सापडल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, पोलिस, सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांनी संयुक्त कारवाई करत विनामस्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा धडाका लावला आहे. गत काही दिवसांत त्यातून सुमारे साडेबारा हजारांचा दंड वसूल केला आहे. शिवाय जनजागृतीही करण्यात येत आहे. या कारवाईने लोकांनी दंडापासून वाचण्यासाठी का होईना मास्क वापरण्यास सुरवात केलेली दिसते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणात शिक्षा जाहीर; भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप यावर निर्णय?

Gangapur Fraud : गंगापूरमध्ये खोट्या भीतीचा डाव; पतीच्या संबंधाचे खोटे आमिष दाखवून विवाहितेची पाच लाखांची लूट

Pune Nashik Highway Crash: पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; आयटी अभियंत्याचा मृत्यू, पत्नींसह सात जखमी

SCROLL FOR NEXT