Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

दुचाकी चोरट्यांवर राहणार पोलिसांची करडी नजर; एसपी बन्सल महत्वपूर्ण निर्णयाच्या तयारीत!

प्रवीण जाधव

सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. अगदी जिल्हा न्यायालय व पोलिस मुख्यालयाच्या आवारातील दुचाकी चोरून चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांसमोर आव्हानच निर्माण केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या या त्रासावर जालीम उपाय करण्यासाठी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी ठोस भूमिका घेणे आवश्‍यक आहे. 

विविध प्रकारच्या फायनान्स कंपन्यांमार्फत पगार पावती ते सात-बारा उताऱ्यावरही अत्यल्प रक्कम भरून हप्त्याने दुचाकी मिळत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत दुचाकीचा वापर सध्या सर्वसमावेशक झाला आहे. अगदी सर्वसामान्य घरातही एक व दोन दुचाकी आहे. दुचाकीच्या या वाढत्या प्रमाणाबरोबर त्यावर डल्ला मारणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसाआड किमान एका दुचाकीची चोरी ठरलेलीच असते. मुख्य बस स्थानक परिसर, कार्यालयांनी गजबजलेला पोवई नाका अगदी जिल्हा न्यायालयाचा आवारही दुचाकी चोरट्यांनी सोडलेला नाही. सध्या या शासकीय कार्यालयांबरोबर जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांना पाहण्यासाठी, डबा देण्यासाठी येणारे नातेवाईक इतकच काय वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसला आहे. त्यामुळे सेवा कालावधीतही त्यांच्या मनात एक प्रकारची धास्ती राहात आहे. 

त्यात काही दिवसांपूर्वी थेट पोलिस मुख्यालयाच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकीही चोरीला गेली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंदही झाली आहे. त्यामुळे चोरट्यांना पोलिसांची धास्ती आहे, की नाही असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर अशा घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्‍न उपस्थित करतात. दुचाकी चोरीच्या या घटनांमुळे काटकसर करून हप्ते भरणाऱ्या वाहनधारकांत चिंतेच वातावरण पसरले आहे. एकीकडे चोऱ्या वाढत असताना त्या उघडकीस येण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. दर वर्षी चोरीला गेलेल्या एकूण गाड्यांपैकी 30 टक्‍यांपर्यंतचीच वाहने शोधण्यात पोलिसांना यश येत आहे. पोलिसांकडून वाहन तपासणी, नाकाबंदी दररोज सुरू असली, तरी वाहन चोर त्यांच्या हाताला लागत नाही. याची कारणे तपासण्याची गरज आहे. 

नागरिकांच्या वाहनांची संपत्ती असुरक्षित 

अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना दुचाकी चोरांची माहिती असतेही; परंतु वाहनासह सापडला तरच कारवाई करायची, अशी धारणा अनेकांची झाली आहे. त्यामुळे चोरट्यांचे फावत चालले आहे. पोलिस मुख्यालयात येऊन चोरी करण्याचे धाडस करणाऱ्यांना अन्य ठिकाणी बिनधास्तपणे दुचाकी चोरी करण्याची कसली धास्ती राहणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या वाहनांची संपत्ती असुरक्षित झाली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT