कऱ्हाड (जि. सातारा) : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा समाधी परिसर, त्यालगतची प्रीतिसंगम बाग आदी ठिकाणी होणारी हुल्लडबाजीला लगाम बसणार आहे. वास्तविक दीड वर्षापूर्वी बागेतील कोपऱ्यात पोलिस चौकीला पालिकेने ठराव घेऊन मान्यता दिली होती. त्या जागेत आता 20 लाख खर्चून पोलिस चौकीची इमारत, त्यासाठीच्या सुविधा पालिकेने पुरवल्या आहेत. त्यामुळे समाधिस्थळाच्या पावित्र्यासह बाग परिसरातील स्वैराचारालाही लगाम लागणार आहे.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे समाधिस्थळ, त्यालगत बाग आणि किमान 200 मंदिरांचा वारसा सांगणारा ऐतिहासिक कृष्णा घाट येथे आहे. त्यामुळे येथे स्थानिकांसह बाहेरील पर्यटकांचा राबता आहे. समाधिस्थळ, बाग, मंदिरांचा परिसर पाहण्यास सहलीही येतात. मात्र, अलीकडच्या काळात त्या भागातील शांतता हरवली आहे, तेथे हुल्लडबाजांचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे त्या भागात पोलिस चौकी व्हावी, अशी यशवंतप्रेमींचा मागणी होती. त्यासाठी मनसेच्या ऍड. विकास पवार, शहराध्यक्ष सागर बर्गे, दादा शिंगण यांनी आंदोलनही केले होते. त्यांच्या लढ्यानंतर पालिकेने पोलिस चौकीसाठी जागा दिली. दीड वर्षात पोलिस चौकीची इमारतही उभी राहिली आहे. त्यासाठी पालिकेने 20 लाखांचा खर्च केला आहे. ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. कृष्णा घाट व परिसरावर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलिसांना या चौकीमुळे सोपे जाणार आहे.
...असे होणार उपाय
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.