सातारा

सावधान! साताऱ्यातील आठ मार्गांवर पोलिसांची कडक नाकाबंदी; थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांवर करडी नजर

Balkrishna Madhale

सातारा : कोरोनाच्या कटू स्मृती मागे टाकत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या आशाआकांक्षांच्या अपेक्षेने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज झाला आहे. त्यामुळे अबालवृद्ध नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. तरुणांनी ठिकठिकाणी पार्ट्यांचे नियोजन केले आहे; परंतु थर्टीफर्स्टच्या जल्लोषाला गालबोट लागू नये, गर्दी होऊन कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून पोलिसांची सर्वत्र करडी नजर राहणार आहे. जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार असून नववर्षाचे स्वागत मद्यपानाने नव्हे, तर दुग्धपानाने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी अनेकांनी बेत आखले आहेत. काही जण पर्यटनस्थळांवर जाऊन थर्टीफर्स्ट साजरा करणार आहेत, तर काहींनी आपल्या परिसरातच कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. या आनंदात अनेक जण मद्यपान करून हुल्लडबाजी करतात. वेगाने वाहने चालवून इतरांच्या आनंदात विरजण घालतात, असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी जिल्हाभर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलिस उपविभागांमधील अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख राज्यमार्ग, शहरांमधील मुख्य चौक, शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर ३१ डिसेंबरच्या रात्री ८.३० पासून ते १ जानेवारी २०२१ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात येणार आहे. या काळात वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. मद्य व अन्य मादक पदार्थांचे सेवन करुन वाहने चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सातारा शहरात वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, गोडोली नाका, बोगदा, समर्थ मंदिर, चांदणी चौक, मोती चौक येथे वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा शहर व शाहूपुरीत पोलिस नाकाबंदी करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT