Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

सातारा पालिकेत 'स्थायी'च्या सभेत तब्बल 62 विषयांना मंजुरी; एक विषय स्थगित

गिरीश चव्हाण

सातारा : सातारा पालिकेच्या स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत कार्योत्तर खर्च मंजुरीच्या 62 विषयांना मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या सोशल मीडियाच्या अनुषंगाने असणारा विषय स्थगित करण्यात आला. ही सभा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

पालिकेच्या स्थायी समितीची सभा आज आयोजिली होती. यासाठी माधवी कदम, मुख्याधिकारी अभिजित बापट, उपाध्यक्ष मनोज शेंडे, नियोजन सभापती निशांत पाटील, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, महिला व बालकल्याण सभापती रजनी जेधे, विरोधी पक्षनेते अशोक मोने तसेच सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या सभेपुढे एकूण 63 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. सर्व विषय समित्यांच्या माध्यमातून कोरोनासह इतर कालावधीत तातडीच्या उपाययोजना राबविण्यासाठी केलेल्या खर्चांना कार्योत्तर मंजुरी देण्याबरोबरच इतर विषयांवर चर्चा झाली. चर्चेअंती विषयपत्रिकेवरील 62 विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभेपुढे पालिकेच्या कामाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना देणे, विविध प्रकारच्या सूचना करणारे मेसेज पाठविणे तसेच इतर अनेक बाबींचा उल्लेख असणारा एक विषय समितीच्या बैठकीत चर्चेसाठी पुढे आला. चर्चेअंती हा विषय स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार हा विषय स्थगित ठेवण्यात आला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT