Satara Latest Marathi News 
सातारा

महिलांना कोविडप्रमाणे महिला सुरक्षा कायद्याची लस द्या; डॉ. सविता मोहितेंची पोलिसांकडे मागणी

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड : ग्रामीण भागातील परितक्‍त्या व निराधार महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी समाजाची आहे. त्या महिलांना त्यांचे हक्क, अधिकार व कायदा याविषयी माहिती देणे तितकेच गरजेचे आहे. महिला सुरक्षा समित्या व निर्भया पथक याकरिता कार्यरत आहेत. त्याचबरोबर आकृतिबंध कार्यक्रम आखून गावोगावी महिला सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणेने जनजागृतीची प्रभावी अंमलबजावणी केल्यास त्याचा फायदा होऊ शकेल. त्याकरिता पोलिसांनी दर तीन महिन्यांने महिलांना विभागवार कोविडप्रमाणेच महिला सुरक्षेबाबत कायद्याची लस टोचावी अर्थात जागृती करावी, अशी मागणी प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सविता मोहिते यांनी केली.
 
कऱ्हाडचे पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील यांच्याकडे डॉ. मोहिते यांनी याबाबत निवेदन देऊन महिला सुरक्षेबाबत पोलिस यंत्रणेचे लक्ष वेधले. या वेळी रत्नमाला पाटील व सोनटक्के उपस्थित होत्या. पोलिस यंत्रणेने आकृतिबंध कार्यक्रम हाती घेऊन दर तीन महिन्यांस ग्रामीण भागात महिला सुरक्षा जाणीव जागृती मोहीम राबवावी. 

त्यात स्थानिक ग्रामस्थ व पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग असावा. त्यात महिलांना त्यांचे हक्क, अधिकार व कायदे याची माहिती समजावून सांगावी. जेणेकरून समाजासमोर पोलिस वर्दीचा धाक राहिल्याने महिला अत्याचाराच्या घटना कमी होतील. थोडक्‍यात गुन्हे घडण्याआधीच त्यासंदर्भात दक्षता घेतल्यास पोलिस ठाण्यांचा कामाचा भार कमी होण्यास मदत होईल, असेही पत्रकात शेवटी म्हटले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : कात्रज चौकात PMPML बसचे ब्रेक फेल, चालकाचे नियंत्रण सुटले; ४ ते ५ वाहनांना धडक...

Dharashiv Drug Raid: धाराशिवमध्ये गांजा-चरस विक्रीवर पोलिसांचा छापा; २२ तोळे सोने, रोकडसह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Mumbai Flat Row: मुंबईत पुन्हा मांसाहारावरून वाद! मनसेची पोलिसांत तक्रार; ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या भागात कसं असेल हवामान?

Land Acquisition: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! भूसंपादनापूर्वी पोटहिस्सा निश्चित होणार, प्रत्यक्ष वहिवाटीनुसार मिळणार मोबदला

SCROLL FOR NEXT