Satara Latest Marathi News 
सातारा

'राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यासन केंद्र उभारा'

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अध्यासन (संशोधन केंद्र) राज्यात उभारावे, तसेच शिवाजी महाराज यांचा सर्व इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रा. शिवाजीराव चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना सुलभपणे छत्रपतींचा इतिहास अभ्यासता येईल, तसेच आणखी संशोधन करता येईल. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांचे चरित्र, पराक्रम शालेय विद्यार्थ्यांपुढे सतत राहावा, त्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, यासाठी शिवाजी महाराज यांचा सर्व इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे गरजेचे आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे उल्लेखनिय कार्य संबंध जगभराला कळावे, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत, तसेच गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी  मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन गडकिल्ल्यांचा विकास साधावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : जंतरमंतर इंटरनेट बंदीप्रकरणी दिल्ली हायकोर्टाची तातडीची सुनावणी; सरकारच्या निर्णयाला आव्हान

SCROLL FOR NEXT