Satara Latest Marathi News 
सातारा

विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात शिवसेना आक्रमक; महाबळेश्‍वरात मोर्चा

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) : शिवसेनेच्या महिला संघटनेच्या रणरागिनींनी मोर्चा काढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकास बडतर्फ करावे व अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी तहसीलदार व पोलिसांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर त्याच शाळेतील मुख्याध्यापकाने अत्याचार केल्याप्रकरणाचा शहरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या मुख्याध्यापकाचा निषेध करण्यासाठी शहर शिवसेनेच्या महिलांची बैठक येथे झाली. या बैठकीनंतर महिलांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. या वेळी शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, तालुका महिला संघटक राजश्री भिसे, जिल्हा संघटक लीलाताई शिंदे, तालुकाप्रमुख वनिता जाधव, शिवसेना शहरप्रमुख महेश गुजर, अर्बन बॅंकेच्या माजी अध्यक्षा वृषाली डोईफोडे, राजेंद्र पंडित, राजेश सोंडकर, उस्मान खारखंडे, शिल्पा ठक्कर आदी उपस्थित होते. 

संशयित मुख्याध्यापकावर तातडीने आरोपपत्र दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, या मुख्याध्यापकास तातडीने कामावरून बडतर्फ करावे, या मुख्याध्यापकाने इतर कुणावर अत्याचार केले आहेत का, याचा तपास पोलिसांनी करावा, महिलांच्या सुरक्षेसाठी भरोसा सेलची शाखा येथे सुरू करावी, इतर शाळांत असे प्रकार घडले आहेत का, याचीही चौकशी पोलिसांनी स्वतंत्र करावी, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्या रणरागिनींनी पोलिस व तहसीलदारांना दिले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT