सातारा

प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई; कऱ्हाडात पालिकेची जोरदार मोहीम

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कडक कारवाईची मोहीम कऱ्हाड पालिकेने राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत शहरातील दोन विक्रेत्यांवर कारवाई करुन प्रत्येकी पाच हजारांचा दंड पालिकेच्या पथकाने ठोठावला. त्यामुळे प्लास्टिक वापरणारे दुकानदार व हातगाडा व्यावसायिक चांगलेच धास्तावले आहेत.

शहरातील बाजारपेठ कोरोनानंतर पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. बाजारपेठेत सध्या अनेक ठिकाणी दुकानांत कमी जाडीच्या प्लॉस्टिक पिशव्या वापरात असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर, हातगाड्यावरही त्या वापरात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याची दखल घेवून कऱ्हाड पालिकेच्या पथकाने बुधवार पेठेतील शिवाजी क्लॉथ मार्केट समोरील फळ विक्रेत्या हातगाड्यावर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरात असल्याचे निदर्शास आले. पथकातील राम भिसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित हातागाडा व्यावसायिकांकडून त्या पिशव्या जप्त केल्या. त्या पालिकेत नेण्यात आल्या. तेथे त्या हातगाडा व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड करण्यात आला. प्लास्टिक पिशव्या वापरु नये, असेही आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Darvha Crime : सात वर्षीय चिमुकलीचा खून; शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह

Ashok Kharat Files: ''योनी पूजनाचे धक्कादायक व्हिडीओ...'', नेत्याचा खळबळजनक दावा, कॅप्टन खरात नेमकं करायचा तरी काय?

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

तरडे–शिंदवणे रस्त्यावर स्ट्रीट लाईटची मागणी; अपघात टाळण्यासाठी नागरिकांची पुढाकार

SCROLL FOR NEXT