Satara Latest Marathi News 
सातारा

खून, दरोड्यातील सात गुंड सातारा, सांगली, रत्नागिरीतून तडीपार; पोलिस अधीक्षक बन्सलांची धडाकेबाज कारवाई

प्रवीण जाधव

सातारा : उंब्रज परिसरात खून, गर्दी- मारामारी, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोन टोळ्यांतील सात गुंडांना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सातारा, सांगली व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही तालुक्‍यांतून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. 

विशाल अशोक दुटाळ (वय 24), किरण आनंदराव पवार (वय 28), अविनाश राजेंद्र पवार (वय 20) व आषुतोश गणेश संकपाळ (वय 20) (सर्व रा. आंधारवाडी, ता. कऱ्हाड) यांची एक टोळी आहे. गंभीर दुखापत, गर्दी- मारामारी, खुनाचा प्रयत्न अशा गुन्ह्यांमध्ये या टोळीतील सदस्य गुंतले होते. त्यांना सातारा जिल्हा, तसेच सांगलीतील कडेगाव, वाळवा, शिराळा व रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्‍यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. 

दुसरी टोळी पवन ऊर्फ प्रवीण शामराव साळुंखे (वय 34, रा. कवठे, ता. सातारा), राजेंद्र ऊर्फ भिकोबा मारुती मसुगडे (वय 35, रा. नवीन कवठे, ता. कऱ्हाड), कैलास तात्याबा चव्हाण (वय 30, रा. कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड) यांची आहे. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी- मारामारी, आदेशांचा भंग करणे अशा प्रकारचे गुन्ह्यांत सहभाग होता. या सर्वांना सातारा जिल्हा, तसेच सांगलीतील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्‍यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

या दोन्ही टोळ्यांतील गुडांवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, तरीही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे त्यांना तडीपार करण्याबाबत उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अजय गोरड यांनी पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाच्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ, उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अजय गोरड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक फौजदार मधुकर गुरव यांनी पुरावा सादर केला. 

'एसपीं'कडून आतापर्यंत 41 गुंड तडीपार
 
पदभार स्वीकारल्यापासून पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी समाजात दशहत माजविणाऱ्यांना तडीपार करण्याची धडक मोहीम राबविली आहे. त्यानुसार आतापर्यंत दहा प्रस्तावांतील 41 जणांना त्यांनी तडीपार केले आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत झाली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT