सातारा

फायद्याची गोष्ट! ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् दोन लाखांचे बक्षीस मिळवा

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि. सातारा) : गावाची एकी यंदाच्या निवडणुकीतही अबाधित ठेऊन ग्रामपंचायत बिनविरोध करूया, असे विचार डॉ. समीर तांबोळी यांनी व्यक्त केले होते. त्यानुसार यंदाची निवडणूक बिनविरोध केल्यास डॉ. तांबोळी कुटुंबासह अनिल भोसले यांनीही ग्रामविकासासाठी प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. या सकारात्मक विचाराचा गावातील राजकारण्यांनी विचार करावा, अशी साद यानिमित्ताने ग्रामस्थांकडून घातली जात आहे. 

श्री ब्रह्मचैतन्य महाराजांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात गोंदवले बुद्रुकचे नाव पोचले आहे. (कै.) यशवंतराव माने, (कै.) वसंतराव पाटील, (कै.) डॉ. चंदूलाल तांबोळी यांनी गावाचा कारभार यशस्वीपणे हाताळण्याचा वारसा घालून दिला आहे. त्यातून केवळ ग्रामविकासाचा ध्यास घेऊन सर्वच गटतट हातात हात घालून एकत्र येतानाही ग्रामस्थांनी अनेकदा पाहिले आहे. (कै.) विश्वासराव पाटील यांनी तर अनेक पंचवार्षिक सरपंचपदावर काम केले होते. निवडणुकीनंतर विरोधकांची एकत्र चहापान करण्याचीही येथील परंपरा आहे. सन 2010-15 च्या निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गाव एकत्र आले; परंतु त्यात अंशतः अपयश आले होते. यंदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

निवडणुकीसाठीचा खर्च, गट तट, ताणतणाव, वेळेचा अपव्यय हे सर्व टाळून गावाला कुटुंब समजून सर्वांनी एकत्र येण्याची साद येथील डॉ. तांबोळी कुटुंबीयांनी घातली आहे. ग्राम हित लक्षात घेऊन डॉ. रज्जाक तांबोळी, डॉ. समीर तांबोळी, सलीम तांबोळी यांनी एक लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. याशिवाय उद्योजक अनिल भोसले यांनीही एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. यंदाची निवडणूक बिनविरोध झाल्यास ग्रामविकासासाठी मोठ्या प्रमाणात लोकवर्गणीदेखील जमा होण्याची शक्‍यता यानिमित्ताने व्यक्त होत आहे. 

गावातील बुजुर्ग, सामाजिक चळवळीतील ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने यंदाची निवडणूक बिनविरोध झाल्यास गोंदवल्याच्या वैभवात आणखी भर पडेल व गावाच्या विकासाला मोठी चालनादेखील मिळेल. 
-डॉ. समीर तांबोळी, ग्रामस्थ, गोंदवले बुद्रुक 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT