सातारा

कऱ्हाड-पाटण महामार्गावरील मल्हारपेठेत वाहतूक कोंडी; एकेरी वाहतुकीचा बोजवारा

विलास माने

मल्हारपेठ (जि. सातारा) : एल ऍण्ड टी कंपनीच्या चुकीच्या कारभारामुळे सकाळपासून कऱ्हाड-चिपळूण मार्गावर ऐन बाजारादिवशी दिवसभर वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली. पोलिस यंत्रणाही हतबल झाल्याने एकेरी वाहतुकीचा बोजवारा उडाला. त्यामुळे वाहनधारकांना ताटकळत थांबावे लागले, तर अनेकांना एक किलोमीटरची पायपीट करत बाजार गाठवा लागला. 

कऱ्हाड-पाटण महामार्गचे रस्ता रुंदीकरण सुरू आहे. मल्हारपेठमधील पोलिस ठाणे ते विहे घाटादरम्यान एक लाइन रस्ता पूर्ण झाला आहे. दुसऱ्या लाइनचा मुहूर्त कंपनीने 20 दिवसांनंतर मल्हारपेठच्या बाजारा दिवशी काढला. अपुऱ्या रस्त्यामुळे वाहने अडकून पडली. बाजाराच्या दिवशीच सकाळपासून वाहतूक जाम झाल्याने पोलिसांची ताराबळ उडाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी असूनही पोलिसांची अनुपस्थिती चर्चेची ठरली. सायंकाळी चार वाजता काही पोलिस रस्त्यावर वाहतूक सुरळीत करताना दिसले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT