सातारा

कसली महाआघाडी?.. पाटण तालुक्‍यात बिघाडीच; जुना फॉर्म्युला राबवून अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न!

जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) : तालुक्‍यातील 107 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत हातात हात घालून चाललेले महाआघाडी शासनाचे घटक पक्ष या निवडणुकीत महाआघाडी पॅटर्न स्थानिक पातळीवर राबवतील असे सध्या दिसत नाही. व्यासपीठावर एकत्र येणारे महाआघाडी शासनातील घटक पक्ष ग्रामपंचायतींसाठी मात्र, अंतर्गत बैठका घेत असल्यामुळे जुना फॉर्म्युला राबवून अस्तित्व टिकविण्यासाठी शर्तीने लढणारच, असे चित्र सध्या दिसत आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांमध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे शासनाने सर्व निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामुळे आजपर्यंत नेहमीचा दिसणारा आरोप- प्रत्यारोपांचा खेळ व पत्रकबाजी तालुक्‍यात दिसली नाही. त्यातच विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राज्यात महाआघाडी शासनामध्ये सामील असणारे तीनही घटक पक्ष एका व्यासपीठावर आले आणि हातात हात घालून एकत्र संसार करण्याच्या आणाभाकाही घेतल्या. या निवडणुकीत महाआघाडीने भरारी मारली आणि त्या विजयाचा धुरळा हवेत विरण्याअगोदर ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले. पाटण तालुक्‍यामध्ये 107 ग्रामपंचायतींचा त्यामध्ये समावेश आहे. कामरगाव, कोकिसरे, मुरुड, बांबवडे, काढणे, कुंभारगाव, नावडी, पापर्डे, साखरी, सळवे, उमरकांचन, गुढे, कुठरे, धामणी, काळगाव, जानुगडेवाडी आणि तारळे या मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये धुमशान रंगणार आहे. 

राज्यात एकत्र असणारे घटक पक्ष स्थानिक पातळीवर जनमत आजमावण्यासाठी शर्थीने खिंड लढविणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याची प्रचिती तालुक्‍यात गुपचुप चाललेल्या पक्षीय बैठकांमुळे उघड झालेली आहे. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी विभागनिहाय ग्रामपंचायतींचा आढावा घेण्यास सुरुवात केलेली असून, राज्यात आघाडी असली, तरी गावपातळीवर मात्र बिघाडीच पाहावयास मिळेल, असे वाटते. पाटण तालुका म्हटले की देसाई- पाटणकरांचा राजकीय उभा दावा. प्रत्येक निवडणूक काही ठिकाणी कॉंग्रेस पक्षाचा अपवाद सोडला तर देसाई विरुद्ध पाटणकर असा राजकीय संघर्ष होतो. मात्र, आता राज्यात एकत्र सत्तेत असल्याने प्रत्येक जण जपून पावले टाकत आहे. वरवर आघाडी दिसत असली तरी अंतर्गत कुरघोड्या दररोज चालल्या आहेत. फक्त कोणीही राज्यातील आदेशामुळे व्यक्त होत नाही. तोंड दाबून बुक्‍याचा मार स्थानिक पातळीवर कायम कार्यकर्ते खायचे आता देसाई-पाटणकरांना खावा लागत आहे. 

जादा ग्रामपंचायतींवर वर्चस्वासाठी दोन्ही गट सक्रिय
 
निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे व माघार घेईपर्यंत खरे चित्र स्पष्ट होणार नाही. मात्र, अस्तित्वाच्या लढाईसाठी जादा ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यासाठी दोन्ही गट सक्रिय झाल्याने शर्थीची लढाई 107 ग्रामपंचायतींत दिसणार, हेच येणारा काळ अधोरेखित करणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT