Satara Latest Marathi News 
सातारा

नेर धरणातून येरळेत पाणी आल्याने वाळूतस्करीला चाप; पुसेगाव-खटावातील शेतकऱ्यांत आनंद

ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यातील शेती सिंचनासाठी नेर धरणातून येरळा नदीत तसेच नेर मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. उन्हाळा सुरू झाल्याने ऐन गरजेच्या वेळी शेती सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच येरळेच्या कोरड्या नदीपात्रात पाणी आल्याने सहजासहजी होणाऱ्या अवैध वाळू उपशाला देखील चाप बसला आहे. 

पाण्याचा अडथळा आल्यामुळे तूर्तास वाळूचा विषय बाजूला पडल्यासारखा झाला असला तरी, अनेकांनी यापूर्वी मिळेल त्या मार्गाने व सोईस्कर ठिकाणी वाळूचा प्रचंड साठा करून ठेवला आहे. परिणामी, टंचाईमुळे या ठिकाणी वाळूला सोन्याचे मोल आले आहे. नेर धरणातून पाणी सोडावे, यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी वारंवार मागणी करत होते. त्याची दाखल घेत पाटबंधारे विभागाने खटाव तालुक्‍यातील शेतीच्या सिंचनासाठी एक मार्चपासून पाणी सोडले आहे. हे पाणी तालुक्‍याच्या नेर, पुसेगाव, काटकरवाडी, खातगुण, भांडेवाडी, खटाव, सिध्देश्वर कुरोली आणि भुरकवडी पोचले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी नगदी पिकांचे ओलीत करण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

दरवर्षी डिसेंबर महिन्यात धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन पाणी सोडण्याचे नियोजन केले जाते. यंदा पाटबंधारे विभागाने पाणी मागणी अर्ज भरण्याचे आवाहन करूनदेखील शेतकऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्यात आले नव्हते. मात्र, वाढत असलेल्या उन्हामुळे 15 फेब्रुवारीपासून विहिरींची पाणीपातळी कमी होऊ लागल्याने लाभक्षेत्रातील बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या कमतरतेमुळे पिके सुकू लागल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नेर धरणातील पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती. पाटबंधारे विभागाने पिकांना ओलिताची गरज असताना पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पाण्याचा कांदा, ऊस, आले आदी नगदी पिकांना चांगलाच फायदा होणार आहे. 

नैसर्गिक शक्तीचाच प्रभाव आला कामी 

येरळा नदीत मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूउपसा सुरू होता. मात्र, सिंचनासाठी येरळा नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे वाळू उपशाला बराचसा लगाम बसला आहे. त्यामुळे नदीतील वाळूच्या रक्षणासाठी नैसर्गिक शक्तीचाच प्रभाव कामी आल्याचे चित्र नेर ते खटावदरम्यान सध्या दिसत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan News: सिलिंडरच्या टंचाईवर बायोगॅसची मात; पाचलगावच्या महिलेचा उपक्रम; कृषी विभागाच्या मदतीने उभारले संयंत्र

Nagpur News: युद्धाच्या झळांनी ग्रामीण भाग होरपळतोय; डिझेलअभावी शेतीकामात अडथळा: पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी

Latest Marathi News Live Update : भोंदू खरातकडून माइंड रीडिंगच्या नावाखाली महिलांच्या भावनिक आणि मानसिकतेचा फायदा घेत फसवणूक

Supreme Court: सुट्टीवर कोर्टाचा मोठा निर्णय! धार्मिक स्वातंत्र्याला मर्यादा, देशभर सुट्टीची मागणी फेटाळली

Washim News: महामार्गांवरील वृक्षतोडीला थांबवा; शहरातील नागरिकांची न्यायालयात धाव; शंभर वर्ष जुन्या वृक्षावार घाला

SCROLL FOR NEXT