सातारा

फलटण-पंढरपूर मार्गावर वाढदिनीच युवतीवर काळाचा घाला; विडणीत दुचाकीला ट्रॅक्‍टरची धडक

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण-पंढरपूर मार्गावर येथील महाविद्यालयीन युवतीचा विडणीच्या हद्दीत अपघाती मृत्यू झाला. आपला वाढदिवस घरी साजरा करून केकसह मैत्रिणीकडे जातानाच वाढदिवसादिवशीच तिच्यावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पर्णवी तथा जान्हवी संजय काकडे (वय 21 मंगळवार पेठ, फलटण) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. 

फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्णवी ऊर्फ जान्हवी संजय काकडे (वय 21, रा. मंगळवार पेठ, फलटण) ही युवती शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास फलटणहून विडणीकडे आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या मैत्रिणीकडे दुचाकीवरून जात होती. त्या वेळी विडणीच्या हद्दीतील कोकरेवस्ती येथे तिच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्‍टरने (एमएच 45 एस 3372) ओव्हरटेक करताना मागील ट्रॉलीची धडक बसली. यामध्ये जान्हवी काकडे ही गंभीर जखमी झाली. जान्हवी हिस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या अपघातातील ट्रॅक्‍टरचालक हा अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रॅक्‍टरसह फरारी झाला असून, या अपघाताचा तपास पोलिस उपनिरीक्षक उस्मान शेख करीत आहेत. 

जान्हवी एमएस्सी ऍग्री होती. सध्या ती युपीएससी परीक्षेचा अभ्यास करत होती. तिने नुकतीच युपीएससीची परीक्षाही दिली होती. दरम्यान, जान्हवीचा मित्र परिवार मोठा होता. 31 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता तिचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला होता. दुपारपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या; परंतु वाढदिवसादिवशीच तिचा अपघाती मृत्यू झाल्याने शुभेच्छांचा वर्षाव केलेल्यांना जान्हवीस श्रद्धांजली वाहण्याची दुर्दैवी वेळ नातलग व मित्रपरिवारावर आली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT