Satara Latest Marathi News 
सातारा

'सुटी नाय द्यायची... निर्णयाशिवाय जायचं नाय'; अठ्ठ्याऐंशी वर्षीय जगतापांचा निर्धार

रूपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : "सुटी नाय द्यायची... निर्णय झाल्याशिवाय जायचं नाय. किती का दिवस लागना इथनं जायचं नाय. त्यांनी फेऱ्या वारीत फक्त दमवायचं धरलंय. आज निर्णय नाय झाला, तर उद्याच्याला शंभराचं सव्वाशे होऊ. दिवसाला पन्नास, पंचवीसजण वाढवू,' असा निर्धार अठ्ठ्याऐंशी वर्षीय यशवंत जगताप यांनी व्यक्त केला. 

म्हसवड परिसरातील कूळधारक शेतकऱ्यांच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज सहावा दिवस होता. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यशवंत जगताप या शेतकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

यशवंत जगताप म्हणाले, ""सोळा आण्याचा रुपाया असतू त्यो बत्तीस आण्याचा झालाय. जमीन एकरच पण झालीय दोघांच्या नावावर. तलाठ्याकडं गेलं की त्यो म्हणतूय तुमची नावंच निघत नाहीती. ऑनलाईननं नावं आपूट निघून गेलीती. वाड्यातली (जमीनदार) माणसं व्हयचं म्हणलीती, कधी कुणाला नाय म्हणली नायती, कावली नायती; पण नावाव करून देण्याच्या नावानं ठणठण गोपाळा.' या वेळी निर्णय होईल, अशी आशा त्यांना वाटू लागली आहे. एकूणच मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटायचं नाही, असा ठाम निर्धार ठिय्या आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Maglev Bullet Train: विमानालाही टाकले मागे! ५ सेकंदात ८०० किमी प्रति तास वेग; चीनच्या 'मॅग्लेव' ट्रेनचा वर्ल्ड रेकॉर्ड!

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने कार्यवाही केली रद्द

Sangli Miraj Expansion : कुठे वाढणार महापालिकेचा विस्तार? तीनही शहरांचे केंद्र बदलले; 'या' भागातील जमिनींचे भाव गगनाला भिडणार?

SCROLL FOR NEXT