Satara Latest Marathi News 
सातारा

कऱ्हाडात वानराच्या हल्ल्यात मंगळवार पेठेतील दीड वर्षाची चिमुकली जखमी

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : येथील मंगळवार पेठेतील पालकर वाडा परिसरात दोन दिवसांपासून वानरांच्या कळपाने उच्छाद घातला आहे. त्यातील एका वानराने आज एका दीड वर्षाच्या मुलीवर धाव घेतली. वानराची नखे लागल्याने ती जखमी झाली. वानराने त्या मुलीला चावा घेण्याचाही प्रयत्न केला. नागरिकांनी हटकल्याने वानर पळून गेले. वन विभागाचे काही कर्मचारी या पेठेत दाखल झाले होते. बराच वेळ शोध घेतला. मात्र, वानर नक्की कोठे गेले ते समजले नाही.
 
येथील मंगळवार पेठेतील काही भागांत दोन दिवसांपासून वानराच्या कळपाने उच्छाद घातला आहे. अनेकांच्या घरातील खाद्यपदार्थांवर वानरे ताव मारत आहेत. वाळत घातलेले खाद्यपदार्थ पळवून नेत आहे. खाद्यपदार्थ्याच्या आमिषाने वानर घरातही शिरून नागरिकांच्या अंगावर जाण्याचा प्रकार घडत आहे. येथील सूर्यवंशी यांच्या घरासमोरही असाचा प्रकार झाला. पालकर वाडा, पालकर बोळ व शिंदे यांच्या घरासमोरही वानरांची टोळी उच्छाद घालत आहे. 

पालकर वाडा परिसरात बाहेर अंगणात खेळणाऱ्या दीड वर्षाच्या मुलीच्या अंगावर वानर आज धावून आले. दुपारी दोनच्या सुमारास प्रकार घडला. प्रसंगावधान राखून तेथे असलेल्या नागरिकांनी त्या वानरास हटकल्याने ते तेथून पळाले. मात्र, त्याचे नख लागल्याने लहान मुलगी किरकोळ जखमी आहे. पर्यावरण अभ्यासक रोहन भाटे व वन विभागालाही नागरिकांनी कळवले. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तेथे आले. मात्र, तोपर्यंत ते वानर निघून गेले होते. दुपारी दोन तास शोध घेण्यात आला. मात्र, वानर काही सापडले नाही. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Petrol Price Hike: पाकिस्तानात 2 दिवसांपूर्वी पेट्रोल स्वस्त, आज मोठी दरवाढ! भारतातही पेट्रोल-डिझेल महागणार?

Police Suspension News: 'खिशात पावडर टाकून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करेन', मुलांना धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; गृह विभागाचा दणका

AC चे तापमान २४ अंशांवर का ठेवावे?  'ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी'ने सांगितला महत्वाचा नियम!

Latest Marathi Update : - नाशिकमध्ये पुराच्या धोक्याचा अलर्ट

Brain Health: फक्त व्यायाम नाही! मेंदू निरोगी आणि तल्लख ठेवण्यासाठी 'या' गोष्टीही आहेत महत्त्वाच्या; जाणून घ्या तज्ज्ञांचा गोल्डन मंत्र

SCROLL FOR NEXT