koregaon 
सातारा

खबऱ्याच्या संशयावरून युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव (जि. सातारा) : "आम्ही चोऱ्या केल्याच्या खबरी तू पोलिसांना देतोस', असा संशय घेत आसगावमधील (ता. कोरेगाव) युवकाचा बरचा, काठीसह लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून खून केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विजय काज्या काळे (वय 30 वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास दरे (ता. कोरेगाव) येथील माळावर पालासमोर ही घटना घडली. 

या प्रकरणी अशोक जमन्या भोसले, दऱ्या खटपट्या भोसले, परिवार विनोद भोसले, सच्या गब्बर भोसले, समीर गब्बर भोसले, अक्ष्या शेज्या भोसले (सर्व रा. मालगाव, ता. सातारा), अत्याचार मुजेस काळे, अतिक्रमण मुजेस काळे (दोघेही रा. रेवडी, ता. कोरेगाव), नाना पाटेकर (रा. आरफळ, ता. सातारा) या नऊ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

या संदर्भात काज्या सावता काळे (रा. आसगाव, ता. कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की "आम्ही चोऱ्या केल्याच्या खबरी तू पोलिसांना देतोस', असे म्हणून मुलगा विजय यास अशोक भोसले याने हातात बरचा घेऊन तसेच समीर भोसले, अत्याचार काळे, अतिक्रमण काळे यांनी हातात काठ्या घेऊन तसेच इतरांनी हाताने, लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी दऱ्या भोसले, अतिक्रमण काळे व अत्याचार काळे यांनी विजयचे हात पाठीमागे धरून अशोक भोसलेने हातातील बरच्याने विजयच्या मांडीवर पुढील बाजूस जोरात खुपसून जखमी केले. उपचारास दाखल करण्यापूर्वी विजयचा मृत्यू झाला होता. सहायक पोलिस निरीक्षक साळुंखे तपास करत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Industrial Gas Connection: वाळूज उद्योगांना दिलासा! १० मोठ्या कंपन्यांना पाइप्ड गॅस जोडणी सुरू; गॅस टंचाईवर उपाय; वाळूजमधील उद्योगांकडे आता ‘PNG’चा पर्याय

Sambhajinagar Garbage Issue: कुठे ड्रेनेज फुटली, कुठे कचऱ्याचे ढीग; शहरातील नागरिक त्रस्त; घंटागाडी गायब, रस्त्यावर कचरा

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2026

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026

SCROLL FOR NEXT