man 
सातारा

अरे बापरे... "या' वाडीत गांजाची शेती

सकाळ वृत्तसेवा

म्हसवड (जि. सातारा) ः बनगरवाडी (ता. माण) येथील शिंगाडे वस्तीनजीकच्या शेतात विक्रीसाठी लागवड केलेल्या सुमारे 12 फूट उंचीची सात लाख 81 हजार 750 रुपये किमतीची गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनगरवाडी येथील शिंगाडे वस्तीत शेतात गांजाची लागवड करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळाली. त्यांतर जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना त्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, तहसीलदार बाई माने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, म्हसवडचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे, प्रसन्ना जराड, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे व उत्तम दगडे, हवालदार तानाजी माने, विजय कांबळे, मुबीन मुलाणी, संतोष पवार आदींचा समावेश असलेल्या पथकाने काल (ता. 4) बनगरवाडीतील शेतावर छापा टाकला. त्यावेळी दोघे जण शेतातील गांजाच्या झाडाचा पाला तोडत असल्याचे सापडले. चौकशी केली असता विक्रीसाठी गांजाच्या झाडाचा पाला तोडत असल्याची कबुलीही त्यांनी दिली. 

या पथकातील पोलिसांनी शेतातील गांजाची सर्व झाडे उपटून जप्त केली. जप्त केलेल्या 78 किलोग्रॅम वजनाच्या गांजाची सुमारे सात लाख 81 हजार 750 रुपये किंमत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad: शिवभक्तांसाठी आनंदवार्ता! ३५० नाही तर ५० रुपयांत रोपवेने रायगडावर जाता येणार, महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; नवा प्लॅन काय?

Theatre Collaboration : सहयोग, संवाद आणि विश्वासातून घडणाऱ्या नाटककलेचा सर्जनशील प्रवास

Ketan Agrawal Murder Case: केतन लोहगडवरून बचावला तर... सियाकडे होता 'प्लॅन बी', तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा!

Indian Cinema History : ‘प्रकल्पवाटा’ पुस्तकातून उलगडते विद्यार्थीकेंद्रित प्रभावी आणि नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती

Rahuri Mystery: राहुरीत अनोखे रहस्य! शब्बीर जिवंत परतल्याने प्रशासन हादरले; कबरीतील मृतदेह कोणाचा, डीएनए अहवालावर नजर..

SCROLL FOR NEXT