Satara 
सातारा

तातडीचे काम असेल तरच "झेडपी'त या!, कोरोना रोखण्यासाठी नियमावली जाहीर

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्हा परिषद इमारतीत होऊ नये, यासाठी आता कडक उपाययोजना जाहीर केल्या असून, नागरिकांनी आपल्या कामाचा पाठपुरावा दूरध्वनीवरून करावा आणि जिल्हा परिषदेतील गर्दी टाळवी, असे सुचविले आहे. 

जिल्हा परिषदेच्या कामकाजासंदर्भात अत्यंत काटेकोर नियमावली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी जाहीर केली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असून, रुग्णांची संख्या वाढत आहे. ती साखळी तोडणे आवश्‍यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेत इमारतीमध्ये होणारी गर्दी टाळली जाणार आहे. 

जिल्हा परिषदेची मुख्य इमारत आणि विस्तारित इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, नागरिकांसाठी मुख्य इमारतीचा एकच मार्ग उघडा ठेवण्यात येणार आहे. पर्यायी सर्व मार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत, तसेच अधिकारी, पदाधिकारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्याच वाहनांना जिल्हा परिषद आवारात प्रवेश दिला जाणार आहे. इतर सर्व खासगी वाहनांना प्रवेशास बंदी राहील. प्रत्येकाजवळ आयकार्ड असणे बंधनकारक असणार आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एकच गेट सुरू ठेवण्यात येणार आहे. पूर्वीप्रमाणेच थर्मल तपासणी आणि सॅनिटायझर प्रवेशद्वारावरच बंधनकारक आहे.

प्रवेशद्वारात तळमजला येथे टपाल व्यवस्था करण्यात आली आहे. या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची दिवसानुसार विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण इमारतीमधील कोणत्याही विभागाचे टपाल तिथेच स्वीकारले जाईल. तालुका विभागाचे टपाल संबंधितांना तेथेच देण्यात येईल. इमारतीत प्रवेश दिला जाणार नाही. जिल्हा परिषदेमधील विविध कार्यालयाकडे येणारे पोस्टाचे टपाल, तसेच अभ्यागतांनी समक्ष दिलेले अर्ज येथे स्वीकारण्यात येतील. अत्यंत महत्त्वाचे टपाल असेल, तरच टपाल आणावे, असे देखील नमूद करण्यात आले आहे. 

...या संकेतस्थळावर टपाल पाठवा 

अन्यथा zpsataratapal@gmail.com या संकेतस्थळावर टपाल पाठवण्यात यावे, असे सुचविण्यात आले आहे. नागरिकांना एखाद्या विभागात काही काम असेल, तर कामाचे स्वरूप, विभागाचे नाव, दूरध्वनी क्रमांक इत्यादी मजकूर लिहून तो कागद प्रवेशद्वारावरील टपाल व्यवस्थेमध्ये जमा करावा. त्या नागरिकाला त्याच्या कामासंदर्भात संबंधित अधिकारी आणि कर्मचारी स्वतः दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करतील. या संपूर्ण नियमावलीची काटेकोरपणे तत्काळ अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला आहे. नागरिकांनी या सर्व नियमांची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहने करण्यात आले आहे. 
 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT