blood
blood 
सातारा

फलटणकरांनो.... रक्तदान करा!

सकाळ वृत्तसेवा

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण शहरातील रक्तपेढीत (ब्लड बॅंक) रक्ताची मागणी जास्त असून, त्या तुलनेत रक्ताचा साठा कमी आहे. त्यामुळे भविष्यात रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी रक्तदात्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन ब्लड बॅंकेच्या संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

कोरोनाच्या महामारीत रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इतर आजारांच्या रुग्णांची संख्याही काही कमी नाही. त्यामुळे अत्यावश्‍यक वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे. कोरोनासाठी आवश्‍यक असलेली यंत्रणाही तालुका पातळीवर तयार ठेवण्यात आली आहे. लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने रक्तसंकलनाचे प्रमाणही कमी झाले आहे. आगामी काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे रक्ताचे विविध प्रकारचे आजार असलेल्यांना, तसेच प्रसूतीसह इतर अत्यावश्‍यक शस्त्रक्रियांसाठी रक्ताची उपलब्धता कशी करावयाची, हा प्रश्न आता रक्तपेढ्यांपुढे निर्माण झाला आहे. लॉकडाउनचा कालावधी वाढेल, याची कल्पना नसल्याने राज्यातील रक्तपेढ्यांनी तेवढ्याच कालावधीसाठी रक्ताचे नियोजन केलेले होते. रक्त हे एका ठराविक कालमर्यादेपलीकडे साठवून ठेवता येत नाही. यामुळेच संभाव्य परिस्थिती लक्षात घेता फलटण ब्लड बॅंकेने रक्तदात्यांना रक्तदानाचे आवाहन केले आहे. दिवसेंदिवस रक्ताच्या मागणीत वाढ होत असतानाच त्याच्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे रक्ताची आवश्‍यकता भासल्यास रुग्णाच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागते. रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, आपण स्वतः किंवा आपल्या मित्र परिवारास रक्तदानासाठी उद्युक्त करावे, असे आवाहन डॉ. बिपिन शहा, डॉ. श्रीकांत करवा, डॉ. संतोष गांधी व डॉ. दत्तात्रय देशपांडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT