निधी वेळेत खर्च करण्याचे नियोजन करा esakal
सातारा

सातारा : निधी वेळेत खर्च करण्याचे नियोजन करा

विनय गौडा; पालखी सोहळ्याच्या मुक्कामात सर्व विभागांनी समन्वय ठेवा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम सातारा जिल्ह्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, आरोग्य, पाणीपुरवठा विभागाने सतर्क राहून संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून योग्य त्या उपाययोजना करा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत विविध योजनांसाठी आलेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी सर्व विभागांनी नियोजन करावे, अशा सूचना ठराव समितीच्या सभेत केल्या. या सभेत विषयपत्रिकेसह ऐनवेळच्या विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा श्री. गौडा यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या सभेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव आदी उपस्थित होते. क्षेत्र महाबळेश्वर (ता. महाबळेश्वर) येथे पंचायत क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर कर बसविण्यास मान्यता मिळण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्यावर या सभेत एकमत झाले.

दिव्यांगांना घरकूल पुरवणे ६४ लाख रुपये, दिव्यांगांना झेरॉक्स मशिन पुरवणे ३० लाख रुपये, यशवंत घरकुल योजनेसाठी ६७ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. कृषी अवजारे, पीक संरक्षण आयुधे, विद्युत पंप संच, इंजिन, पाइप, ताडपत्री, यंत्रे व मशिनरींच्या अनुदानाचे दर निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या सभेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, बांधकाम उत्तरचे कार्यकारी अभियंता अभय पेशवे, दक्षिणचे कार्यकारी अभियंता प्रशांत खैरमोडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, महिला बालकल्याणच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अरुणकुमार दिलपाक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT