सातारा

युवकाच्या खून प्रकरणी अकलूज तालुक्यातून तीन युवकांना अटक

विलास साळूंखे

भुईंज (जि. सातारा) : आसले (ता. वाई) येथील युवक ओंकार कैलास चव्हाण याच्या खून प्रकरणातील तीन फरारी संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली. आसले येथील ओंकार चव्हाण बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी ता. 4 रोजी भुईंज पोलिस ठाण्यात नोंदवली होती. या तक्रारीच्या तपासादरम्यान ओंकारचे अपहरण करून भुईंज येथील युवकांनी खून केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. यानुसार पोलिसांच्या पथकाने तपास करत ओंकारच्या खूनप्रकरणी चौघांना अटक केली. अटक केलेल्या चौघांचे तीन साथीदार गुन्हा घडल्यापासून फरारी होते.

त्यांचा पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार उत्तम दबडे, कर्मचारी आतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, अमित सपकाळ, गणेश कापरे, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, विजय सावंत हे शोध घेत होते.

महाबळेश्‍वरात पहिल्यांदाच दिसले पांढऱ्या रंगाचे शेकरू

शोधादरम्यान या पथकाने वेळापूर (ता. अकलूज) येथून अक्षय संजीव जाधव (वय 21), जयेश ऊर्फ बंटी शामराव मोरे (वय 32) वरुण समरसिंग जाधव (वय 23, सर्व रा. भुईंज) यांना अटक केली. त्यांच्याकडून एक चार चाकी वाहन सुद्धा जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्या त्या तिघांचा ताबा भुईंज पोलिसांकडे देण्यात आला आहे.

मी पाचवडला जाऊन येतो, असे सांगून घरा बाहेर पडलेल्या मुलाचा झाला खून!

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT