Police
Police sakal
सातारा

गुन्हेगारीकडे झुकणाऱ्या युवकांवर फोकस ; बी. आर. पाटील

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : शहर परिसरात वाढणाऱ्या ‘क्राईम रेट’सह गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्यांना रोखण्यासाठी शहर पोलिस उपक्रम राबवत आहेत. कॉलेज, शाळेत पोलिसांनी जागृती अभियान राबविले जाणार आहे. पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

गुंडगिरीकडे झुकलेल्या युवकांवर विशेष फोकस करून उपक्रम राबविला जाणार आहे. करिअर सुरू होण्यापूर्वीच गुन्ह्यांत सहभागी झालेले युवकांचे होणारे नुकसान, गुंडगिरीच्या आकर्षणामुळे झालेले नुकसान, प्रत्यक्ष गुन्ह्यातील सहभागी युवक, त्यांचे नातेवाईक, मित्रांच्या मुलाखती पोलिस घेणार आहेत. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांशी संपर्क साधला आहे. पोलिस निरीक्षक पाटील यांच्या पुढाकाराने जागृतीचा विशेष कार्यक्रम राबविला जाणार आहे. कऱ्हाडला कोल्हापूर, पुण्यानंतरची तालुका पातळीवरची विद्यानगरी आहे. कऱ्हाड, मलकापुरातही महाविद्यालये आहेत.

किमान २० हजार युवक रोज शिक्षणानिमित्ताने परिसरात येतात. परिणामी त्या भागावर पोलिसांना नेहमीच फोकस करावा लागतो. महाविद्यालय परिसरातील क्राईम रेट वाढला आहे. किरकोळ कारणावरून वादावादीचे प्रसंग होतात. तीन वर्षांपूर्वी केवळ खुन्नसवरून महाविद्यालयीन युवकाच्या खुनाची घटना घडली. ओगलेवाडी येथेही झालेल्या खुनात महाविद्यालयीन युवकांचा सहभाग होता. वादाचे प्रसंग नेहमीचे आहेत. कोरोनाने त्यात शिथिलता होती. मात्र, आता पुन्हा शाळा, महाविद्यालये टप्प्याटप्प्याने खुली होत आहेत. त्यामुळे तीच स्थिती येऊ नये, यासाठी मारामारीसह त्यामागच्या कारणांचा पोलिस अभ्यास करणार आहेत. त्यासाठी पोलिस निरीक्षक पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. मध्यंतरी शहरातील बहुतांशी महाविद्यालयांना प्रत्यक्षात भेटी दिल्या.

प्राचार्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. त्यातील सरसनिरस गोष्टीवर चर्चा केली. त्यातून महाविद्यालयीन युवकांच्या सोशल माध्यमांचा अभ्यास केला. त्यात धक्कादायक माहिती हाती आली. महाविद्यालयीन युवकांना गुंडगिरीचे फॅड लक्षात आले. गुंडांचे फालोअर्स कळाल्याने त्या सगळ्या युवकांवर फोकस केले जाणार आहे. मारामारी व त्याच्या कारणांचाही सखोल अभ्यास सुरू आहे. त्यामुळे युवकांवर फोकस करून त्यांना चांगल्या मार्गाला लावण्यासाठी कृतिशील कार्यक्रम लवकरच राबविला जाणार आहे.

शाळा, महाविद्यालयीन वयातील किशोरवयीन गुन्हेगारीकडे आकर्षित होत आहेत. त्या युवकांना फोकस करून जागृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

-बी. आर. पाटील, पोलिस निरीक्षक, कऱ्हाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT