satara municipality
satara municipality  sakal media
सातारा

सातारा : बागांमधील राजकीय घुसखोरी थांबवणार

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा पालिकेच्‍या मालकीच्‍या असणाऱ्या चार बागांमध्‍ये राजकीय पाठबळावर घुसखोरी करत दांडगाईने मांडण्‍यात येणारा खेळण्‍यांचा बाजार बंद पाडण्‍याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यानुसार शहरातील बागांमध्‍ये खासगी व्‍यक्‍तींना ठेकेदारी पध्‍दतीने खेळणी बसविण्‍यास परवानगी देण्‍यात येणार असून त्‍याचे दर सर्वसामान्‍यांना परवडतील, असे ठरविण्‍यावर पालिकेचा भर आहे. यामुळे पालिकेचे उत्‍पन्न वाढून बागांमधील राजकीय दांडगाई मोडीत निघणार आहे.

सातारा शहरात राजवाडा येथील श्रीमंत प्रतापसिंह उद्यान, गुरुवार बाग, गोडोली आयुर्वेदिक उद्यान, सदरबझार मधील सुमित्राराजे उद्यान पालिकेच्‍या मालकीची आहेत. येथील खेळण्‍ंयाची देखभाल पालिकेच्‍या वतीने करण्‍यात येते.

उत्‍पन्नवाढीसाठी निर्णय

बागांमधील पूर्वांपार खेळण्‍यांबरोबरच लहान मुलांना अत्‍याधुनिक, आकर्षक खेळणी उपलब्‍ध व्‍हावीत, यासाठी खासगी व्‍यक्‍तींची मदत घेण्‍याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू असून सर्वसामान्‍यांना परवडतील असे खेळण्‍यांचे दर आणि सुरक्षित सेवा देणाऱ्या व्‍यक्‍ती, संस्‍थांना याबाबतचे अधिकार देण्‍यात येणार आहे. यामुळे पालिकेच्‍या उत्‍पन्नात वाढ होईल, अशी माहिती वृक्षनिरीक्षक प्रणव पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT