Satara Latest Marathi News Satara Politics News
Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

दहिवडी नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी नीलम शिंदेंची बिनविरोध निवड

रूपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : दहिवडी नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी नीलम शिवाजी शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुप्रिया शिंदे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी निवडणूक झाली. 

सत्ताधारी पॅनेल अंतर्गत ठरल्यानुसार निर्धारित वेळेत नीलम शिंदे यांचा एकमेव अर्ज उपाध्यक्षपदासाठी दाखल झाला. या अर्जावर साधना गुंडगे यांनी सूचक, तर सतीश जाधव यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या. त्यानंतर प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी नीलम शिंदे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. 

या वेळी नगराध्यक्ष धनाजी जाधव, मुख्याधिकारी अवधूत कुंभार, माजी नगराध्यक्ष दिलीप जाधव, साधना गुंडगे, सतीश जाधव, नगरसेवक समीर योगे, वैशाली कदम, ललिता जाधव, अर्चना खरात, सुप्रिया शिंदे, जयश्री कोकरे, लिंगराज साखरे आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल नीलम शिंदे यांचे आमदार जयकुमार गोरे, ऍड. भास्करराव गुंडगे, माजी पंचायत समिती सभापती अतुल जाधव, अरुण गोरे, अर्जुन काळे, अतुल शिंदे, महेश कदम, रवींद्र सकुंडे, लालासाहेब ढवाण, विजय खरात आदींनी अभिनंदन केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT