congress 
सातारा

पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य; समाजबांधवांनी संयम राखावा

रुपेश कदम

दहिवडी (ता. सातारा) : सन २००६ पासून मी काँग्रेसचा (congress) निष्ठावंत शिपाई म्हणून काम करत आहे. यापुढेही निष्ठेने काम करत राहीन. माण तालुकाध्यक्षपदाबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील, तो मला मान्य असेल. कार्यकर्त्यांनी व समाजबांधवांनी कोणतेही चुकीचे वर्तन न करता संयम राखावा, असे आवाहन युवक काँग्रेस राज्य चिटणीस दादासाहेब काळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. (satara-political-news-congress-president-mann-election-nana-patole)

दादासाहेब काळे म्हणाले, ‘‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मला माण तालुकाध्यक्षपद निवडीचे पत्र दिले होते. मात्र, मतदारसंघातील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्तीदोषातून चुकीची माहिती दिल्याने अध्यक्षपदाला स्थगिती मिळाली. या प्रकाराबाबत पक्षश्रेष्ठींकडे मी माझी बाजू मांडली आहे. काँग्रेस पक्ष हा तळागाळातील सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेसने नेहमीच न्याय दिला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री विश्वजित कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे आदी वरिष्ठ नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली मी माण-खटाव युवक अध्यक्षपद, राज्य युवक चिटणीसपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. समाजाच्या हितासाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समिती तसेच ओबीसी समन्वयक म्हणून काम करत आहे.’’

प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीला स्थगिती मिळाल्यानंतर समाजबांधव व कार्यकर्त्यांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवत निषेध व्यक्त केले. मात्र, ते माझ्यावरील प्रेमापोटी केले असून सर्वांनी शांत राहून सहकार्य करावे. पक्षश्रेष्ठींना तालुक्यातील राजकीय कुरघोड्या चांगल्याच माहीत आहेत. ते निश्चितच चांगल्या कार्याची दखल घेत मला न्याय देतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT