Satara Latest Marathi News 
सातारा

'या' महत्वाच्या प्रश्नांवर गृहराज्यमंत्र्यांनी 'मी काहीही बोलू शकत नाही' अशी का प्रतिक्रिया दिली?

उमेश बांबरे

सातारा : महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे, यावर मंत्री देसाई म्हणाले, त्यांनाच विचारले तर बरे होईल. ते मोठे नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गृह खात्याचा सीडीआर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावरून विरोधी पक्ष नेत्यांवर गुन्हा दाखल होणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, या प्रश्नावर मी काहीही बोलू शकत नाही. गृह मंत्रालयाच्या समोर नेमकी परिस्थिती येईल. त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

वाझे प्रकरणाची मुख्यमंत्र्यांना सर्व माहिती होती. तरी त्यांनी या प्रकरणावर पांघरूण घातले आहे, अशी टीका फडणवीस करत आहेत, यावर मंत्री देसाई म्हणाले, टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे. ते काहीही बोलतील त्या प्रत्येक गोष्टीला सरकार उत्तर देऊ शकत नाही. परमबीर सिंह यांच्या संपत्तीची चौकशी करण्याच्या मुद्द्यावर मंत्री देसाई यांनी हा विषय माझ्यापर्यंत आलेला नाही. तसेच तो माझ्या अखत्यारीतील विषय नाही. त्यामुळे याबाबत शासनस्तरावरील योग्य व्यक्तीला विचारा, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले. 

शशीकांत शिंदेंना शंभर कोटींची ऑफर भाजपकडून होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा शंभर कोटींचा मुद्दा उपस्थित झाला आहे. यावर बोलताना शंभूराज देसाई यांनी मला याबाबत काहीही माहिती नाही. पण, सरकार शंभर टक्के स्थिर आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत बोलले आहेत. खासदार शरद पवार बोलले आहेत. तसेच बाळासाहेब थोरोत ही याविषयी बोलले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार भक्कम बहुमतांच्या जोरावर ठामपणे उभे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. खासदार उदयनराजे भोसले व नरेंद्र पाटील यांनी जल्लोष करून भाजपचे सरकार येणार, असे सांगितले आहे. यावर शंभूराज देसाईंनी याबाबत मला काहीही महिती नाही, असे सांगून प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गृहराज्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांना काहीच माहित नसल्याने, त्यांनी केवळ 'मी काहीही बोलू शकत नाही' अशी प्रतिक्रिया देत प्रत्येक प्रश्नाला बगल दिली.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT