Satara Latest Marathi News 
सातारा

मी मोठी विकासकामे केल्याने रामराजेंना पोटशूळ; खासदार रणजितसिंहांचा सभापतींवर घणाघात

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : फलटणकरांना प्रतीक्षा असणारी फलटण-पुणे रेल्वेचा प्रारंभ 30 मार्चला केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. आपण अल्पावधीत मोठी विकासकामे केल्याने रामराजेंना पोटशूळ उठला असून त्यांच्या लबाडीला मर्यादा नाहीत. फलटण-आदर्की रस्त्यास आपल्या प्रयत्नाने निधी मंजूर झाला असून वर्षभरापूर्वी आपण या रस्त्याची घोषणा केली होती, असा दावाही त्यांनी केला. 

फलटण तालुका व माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे. रणजितसिंह म्हणाले, ""नीरा-देवघर पाणीप्रश्न, रेल्वे, एमआयडीसी व रस्ते या मुद्द्यांवर आपला भर आहे. फलटण येथे लोणंद- फलटण या रेल्वेचा प्रारंभ झाला होता. त्याच वेळी आपण फलटण ते आदर्की, फलटण-शिंगणापूर-शेणोली फाटा या मार्गांना आपल्या प्रयत्नाने मंजुरी मिळाल्याचे सांगितले होते. या रस्त्यांसाठी 880 कोटींची तरतूद केली आहे. त्या व्यतिरिक्त अन्य 76 कोटींचा निधीही मंजूर करून आणला असून लवकरच त्या कामांची यादी जाहीर करू.'' 

साखरवाडीतील शेकडो कोटींचा कारखाना केवळ 68 कोटीत कोणी गिळला? या कारखान्यात भागीदार कोण, हे न समजण्याइतपत जनता दुधखुळी नाही, असे सांगत या कारखान्याने 25 कोटी रुपयांचे देणे आहे. ते बुडविण्याचा तेथील प्रशासनाचा डाव आहे. परंतु; जर असा प्रयत्न होणार असेल तर गाठ माझ्याशी आहे, हे तेथील प्रशासनातील म्होरक्‍याने ध्यानात ठेवावे, असा इशारा देत त्यांनी देणेकऱ्यांची पै न पै द्यावीच लागेल असे सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून तालुक्‍यात नाईकबोमवाडी येथे आपण दुसरी एमआयडीसी मंजूर करून आणली. परंतु, ती होऊ न देण्याचे काम कायमच रामराजे करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. स्वराज कारखाना मजबूत व खंबीर आहे. पुढील वर्षी हा कारखाना राज्यात सर्वाधिक गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांपैकी एक असेल. स्वराज ग्रुप अंतर्गत आंदोरी (ता. खंडाळा) येथे फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रकल्प सुरू होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

गटार योजनेतील भ्रष्टाचारासह दर्जाची चौकशी करा 

फलटणकरांनी गेली 30 वर्षे रामराजेंना सत्ता दिली आहे. परंतु, ते विकासकामांमध्ये कमी पडल्याचे जाणवत आहे. फलटण शहराची दयनीय अवस्था हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ते झाकण्यासाठी त्यावर 12 कोटींच्या रस्त्याचा मुलामा देण्याचे काम सुरू आहे. परंतु; तेही निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे गटार योजनेतील भ्रष्टाचार व दर्जा याची आधी तपासणी करा व मगच रस्ते करा, अशी आमची भूमिका असल्याचेही रणजितसिंह यांनी स्पष्ट केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha: समृद्धीवर ट्रॅव्हल्स ट्रकवर मागून धडकली; मेहकरजवळील घटना; १५ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी

Karad Highway: कऱ्हाडमध्ये पहिल्याच पावसात महामार्गाची पोलखोल; गटार तुंबले, पाणी-चिखल रस्त्यावर, गटारावरील तुटलेली झाकणेही जीवघेणी

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना धक्का! सलग 10 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ; 10 ग्रॅमचा नवा दर किती?

Pune News: महसूल विभागालाच चकवा! बनावट शासकीय आदेशांचे रॅकेट उघड; भूमाफियांमध्ये खळबळ, महसूल अभिलेखांत फेरफार

Latest Marathi News Update : रमेश केरे पाटील यांचे विखे पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT