Koyna Dam esakal
सातारा

Satara Rain : साताऱ्यात मुसळधार पावसाचा जोर कायम; पाटण, महाबळेश्वरसह जावळीतील तब्बल 700 लोकांचे स्थलांतर

दरडग्रस्त पाटण, महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील सुमारे सातशे लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यात सलग आठवडाभर पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

सातारा : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (Satara Rain) जोर कायम असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी पूरप्रवण व दरडग्रस्त पाटण, महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील सुमारे सातशे लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आज (शुक्रवारी) हवामान विभागाने जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

कोयना (Koyna Dam), कण्हेर आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनेनुसार तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. दरम्यान, वाईत एक महिला ओढ्याच्या पुरात वाहून गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यात सलग आठवडाभर पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणात एका दिवसात सात टीएमसीने पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे कोयना, तसेच हवामान विभागाने आणखी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी, सुरक्षिततेसाठी दरडप्रवण तसेच नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. आतापर्यंत पाटण तालुक्यातील १५, महाबळेश्वर तालुक्यातील २५, तर जावळी तालुक्यातील सहा गावांतील सुमारे सातशे लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

शाळा, महाविद्यालयांना आज सुटी, शिक्षकांना काम...

हवामान विभागाने जिल्हा तसेच घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना आज (शुक्रवारी) सुटी जाहीर केली आहे.

शाळा व महाविद्यालयातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत संबंधित शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

  • कोयना धरणात ७८.२९ टीएमसी पाणीसाठा

  • धरणातून २१ हजार क्युसेक विसर्ग सुरू

  • मोरगिरी विभागात आठ गावे संपर्कहीन

  • जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर बंदी

  • कण्हेरमधून १५ हजार क्युसेक विसर्ग

  • कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

  • लिंब- गोवे (ता. सातारा) येथील कोटेश्‍वर मंदिर पाण्याखाली

  • वीर धरणातून विसर्ग सुरू

धरण क्षमता (टीएमसी) सद्य:स्थितीत साठा

  • कोयना १०५.२५ ७८.२९

  • धोम १३.५० ७.३१

  • कण्हेर १०.१० ८.३३

  • उरमोडी ९.९६ ५.४४

  • तारळी ५.८५ ४.९१

  • धोम बलकवडी ४.०८ २.९२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT