Koyna Dam Patan Satara esakal
सातारा

Koyna Dam : कोयना धरणात 42 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग स्थिर; कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ

Koyna Dam : कोयना नदीपात्रात ४२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

हेमंत पवार

आज गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनानगरला ८८, नवजा १२४ तर महाबळेश्वरला ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कऱ्हाड : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर बुधवारी रात्री वाढला होता. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा आज बुधवारी सकाळी आठ वाजता ८५.८१ टीएमसी झाला होता. सद्यस्थितीत कोयना धरणातून सोडण्यात येत असलेला ४० हजार क्युसेक विसर्ग गेल्या तीन दिवसापासून कायम ठेवण्यात आला आहे.

त्याचबरोबर पायथा वीज गृहातून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कोयना नदीपात्रात ४२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तो विसर्ग तीन दिवसापासून स्थिर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, कृष्णा-कोयना नद्यांच्या (Krishna-Koyna River) पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस पावसाचा जोर रात्रीचा वाढत आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे. पावसाचा जोर दिवसा कमी होत आहे. रात्रीच्या पावसामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजता कोयना धरणातून ४० हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. आज गुरुवारी सकाळी आठ वाजता धरणात ८५.८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

धरणात ४५ हजार १६८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. आज गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनानगरला ८८, नवजा १२४ तर महाबळेश्वरला ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातून मंगळवारी दुपारी बारा वाजता सोडण्यात आलेल्या पाण्यात काल बुधवारी वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे तीन दिवसापासुन ४२ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग पूरस्थितीत निर्माण होवू नये स्थिर ठेवण्यात आला आहे. मात्र, धरणातील पाण्याची आवक वाढल्यास धरणातून अजूनही विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे धरण प्रशासनाने कळवले आहे.

पूरबाधित होणाऱ्या हेळवाकची अधिकाऱ्यांकडून पाहणी

कोयना धरणातून पाणी सोडल्यावर पूरबाधित होणाऱ्या पाटण तालुक्यातील हेळवाकला कोयना धरण व्यवस्थापनचे अधिकारी श्री. पोतदार, श्री. जाधव, श्री. राणे यांनी भेट देवून पाहणी केली. हेळवाक गावचे मंडल अधिकारी संजय जंगम, निलेश भाग्यवंत, प्रवीण सूर्यवंशी, पोलिस पाटील विरेंद्र कदम, सरपंच गजानन कदम, उपसरपंच राहूल कडोले व ग्रामस्थ उपस्थित होते. नदीकाठचे व्यावसायिक, ग्रामस्थांना व घरमालांना सूचना देण्यात आल्या. यावेळी हेळवाकचे सरपंचांनी धरणाचे पाणी सोडल्यानंतर प्रथम हेळवाक गावाला कसा धोका निर्माण होतो याची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT