कऱ्हाड (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत पावसाचा जाेर कमी झालेला नव्हता. कऱ्हाड-पाटण तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी सकाळी अकरानंतर उसंत घेतली. काही भागात अधुन-मधुन अजुनही सरी बरसत आहेत. पावसाचा जोर कमी झाल्याने पुणे-बंगळूर महामार्गावरील गोटे गावानजीकच्या ओढ्याचे महामार्गावर आलेले पाणी निघुन गेले आहे. पाण्याचा निचरा झाल्याने महामार्ग वाहतुकीस मोकळा झाला आहे. महामार्गावर पाणी आल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. महामार्ग देखभाल विभाग, महामार्ग विभाग आणि पोलिसांनी संबंधित ठिकाणी थांबुन वाहतुक पुर्ववत सुरु केली. (satara-rain-update-pune-banglore-national-highway-debhewadi)
दरम्यान पावसाच्या साचलेल्या पाण्यातुन एक चारचाकी वाहन पाण्याचा अंदाज न आल्याने ओढ्यात वाहुन गेली. चालकाने काचा खाली करुन त्यातुन उडी मारुन स्वतःला वाचवले. संबंधित वाहनधारक हे इंचलकरंजीवरुन शिरवळला त्यांच्या कामा निमीत्त निघाले होते. त्यांची चारचाकी ओढ्याच्या पाण्यातुन बाहेर काढण्यासाठी पाण्याची पातळी पुर्ववत होणे आवश्यक आहे.
दरम्यान आज सकाळपासून देखील ढेबेवाडी खोऱ्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे वांगनदीसह ओढे ,नाले भरून वाहत हाेते.शेतात उभ्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले हाेते. कसणी या दुर्गम गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील फरशी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झालेली होती. अनेक दुर्गम गावे व वाड्यावस्त्यांच्या दळणवळणासाठी हा एकमेव पूल आहे. पवारवाडी-कसणी या मार्गावर पवारवाडी जवळ नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून तेथे नदीपात्रात पाईपा टाकून तयार केलेला पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.