राजाभाऊ देशपांडे  sakal
सातारा

सातारा : भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे यांचे निधन

भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे (वय १००) यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले.

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे (वय १००) यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले. नगरसेवक, भाजपचे संघटक म्हणून राजाभाऊ यांचा पक्षात दरारा होता. त्यांनी वयाची शंभरी पार केल्याबद्दल देशपांडे यांचा केंद्रीय अवजड रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांनी २६ सप्टेंबर रोजी सत्कार केला होता. गडकरी यांच्या हस्ते पेढ्यांचा हार घालून देशपांडे यांचा सन्मान केला होता.

देशपांडे १९९० च्या दशकातील आक्रमक नेते म्हणून जिल्ह्याला परिचीत होते. आक्रमक नगरसेवक म्हणूनही त्यांनी १९९० चा कालवधी पालिकेत गाजवला होता. पालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी चांगले काम केले होते. ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या कालवधीत ते आक्रमक विरोधी नगरसेवकाच्या भुमिकेत सातत्याने चर्चेत राहिले होते. मात्र अलीकडे अनेक वर्षापासून श्री. देशपांडे राजकारणापासून अलिप्त राहिले होते.

जिल्ह्यातील भाजपमधील सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून देशपांडे यांचा उल्लेख होतो. वयाची शंभरी पार केलेले देशपांडे अनेक वर्षापासून राजकारणापासून अलिप्त आहेत मात्र पक्षामध्ये त्यांच्या शब्दाला वजन होते. देशपांडे यांनी नुकताच शंभरी प्रवेश केला आहे देशपांडे यांचे भाजपमधील योगदान लक्षात घेऊन भाजपचे अनेक नेते त्यांचा आदर्श मानतात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमानिमित्त येथे दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यामध्ये मंत्री गडकरी यांनी आवर्जून ज्येष्ठ नेते देशपांडे यांची घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीमध्ये दोघांनी पक्षातील जुन्या आठवणींना उजाळा दिला मंत्री गडकरी येणे राजाभाऊ देशपांडे यांचा 100 पेढ्यांचा हार घालून सत्कार केला होता. तो त्यांचा अंतीम कार्यक्रम ठरला. वृद्धपकाळाने त्यांची प्रकृती नाजूक होती. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon ZP Election : आरक्षणाचा पेच कायम; जिल्‍हा परिषद निवडणुका दिवाळीनंतरच? सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणीने लांबणीवर, नव्‍याने निघणार आरक्षण

भाजप आमदाराच्या कार्यालयात बॅगेत आढळलं पिस्तुल, कुणी आणि कशासाठी आणलं?

Valentine Day 2026: व्हॅलेंटाईन डे नंतर कोणते 'डे' येतात? कसा साजरा केला जातो, जाणून घ्या लिस्ट

Narhari Zirwal : पीएने लाच घेण्यास सांगितल्याचा आरोप, मंत्री नरहरी झिरवाळ सकाळपासून 'नॉट रिचेबल; राज्याच्या राजकारणात खळबळ!

Horoscope : प्रेमाचा दिवस सुपर लकी! आज 'या' 5 राशींना होईल आर्थिक लाभ; सिंगल-कपलच्या नात्याला नवे वळण, आयुष्यातली जुनी समस्या संपणार

SCROLL FOR NEXT