Revenue-Department Work News esakal
सातारा

Satara : लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर

क्‍लास वन अधिकाऱ्यांसह २६ जणांवर कारवाई

संजय शिंदे

सातारा : सातारा लाचलुचपत विभागाने गेल्या वर्षात सापळे रचून २६ लाचखोरांना अटक केली आहे. त्यामध्ये महसूल विभागाने ‘नंबर वन’ मिळवला असून, पोलिस, नगरविकास, वीज विभागाने दुसरा क्रमांक मिळवत लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे एका ‘क्‍लास वन’ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. त्यामध्ये महसूल विभाग आघाडीवर आहे. महसूल विभागातील सर्वाधिक ८ जणांना अटक करण्यात आली असून, त्या खालोखाल पोलिस, नगरविकास, वीज वितरण विभागातील प्रत्येकी दोघांना अटक केली आहे. समाजकल्याण विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, ग्रामविकास, जलसंपदा, सहकार व पणन व कृषी विभागातील प्रत्येकी एकावर कारवाई करून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाच्या २० कारवायांत २६ जण जाळ्यात अडकले आहेत.

वर्ग तीनमधील लोकसेवकांचे लाचखोरीत प्रमाण जास्त असून, १७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. एका ‘क्‍लास टू’ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. क्‍लास वन अधिकाऱ्यांवर कारवाई कमी होत असल्याची तक्रार असते; पण गेल्या वर्षी एका ‘क्‍लास वन’ अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. खासगी चार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयात एखाद्या कामासाठी पैशाची मागणी केल्यास लाचलुचपत विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन करूनही अनेक लहान- मोठे सरकारी अधिकारी कामासाठी पैशाची मागणी करतात. भ्रष्टाचार करण्यात महसूल विभागाने प्रथम क्रमांक मिळवला असून, नगरविकास, वीज वितरण विभाग व खाकी वर्दीने दुसरा क्रमांक मिळवला आहे.

कारवाईचा धडाका

सांगलीचे लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्याकडे साताऱ्याचा सात महिने अतिरिक्त कार्यभार होता. या काळात त्यांनी पोलिस निरीक्षक सचिन राऊत, विक्रम पवार व १२ अंमलदारांसह कारवाईचा धडाका केला होता. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते.

तक्रारीसाठी संपर्क

लाच मागणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक पर्याय दिले आहेत. १०६४ हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. त्याचसह दूरध्वनी ०२१६२ -२३८१३९ येथे संपर्क साधावा, तसेच एसीबी महाराष्ट्र नावाने संकेतस्थळावरही तक्रार करू शकता, असे पोलिस निरीक्षक सचिन राऊत यांनी सांगितले.

कारवाईची माहिती

२०१६ - २८

२०१७ - २९

२०१८ - २९

२०१९ - २७

२०२० - २३

२०२१ - २०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT