Satara 
सातारा

पॉस मशिनमुळे कोरोना संसर्गाचा धोका, रेशनिंग दुकानदार धास्तावले

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनामुळे रेशनिंग दुकानदार पॉस मशिनद्वारे धान्य वाटपास चांगले धास्तावले आहेत. पॉस मशिनवर ज्येष्ठ नागरिक, महिलांचे अंगठे हे स्वतः दुकानदारांना त्यांच्या हाताला धरून घ्यावे लागत आहेत. त्यातून दुकानदार आणि ग्राहकांचा संपर्क येत आहे. त्यातच एका मशिनवर अनेकांच्या अंगठ्यांचे ठसे घेतले जातात. त्यामुळे त्यातून कोरोनाच्या संक्रमणाचा धोका असल्याने दुकानदारांनी आता त्यांचाच ठसा घेऊन धान्य वाटपास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास वाटप बंद करण्याचा इशाराही दिला आहे. 

शासनाने लॉकडाउनमध्ये सर्वांनाच मोफत धान्य वाटप मोहीम राबवली. मात्र, ते धान्य बंद झाले आहे. त्यामुळे जे लाभार्थी रेशनिंग घेण्यास पात्र आहेत त्यांना पॉस मशिनवर अंगठ्याचा ठसा उठवावा लागत आहे. त्यानंतरच त्यांना धान्य दिले जात आहे. मात्र, वारंवार ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या अंगठ्यांचा ठसा घेताना तो उठत नाही, तसेच अनेकांची वये झालेली असल्याने त्यांना दुकानदारांना धरून त्यांचे ठसे घ्यावे लागत आहेत. शासनाने अंगठा उठला तरच धान्य द्यावे, असे सांगितले असल्यामुळे दुकानदारांची मोठी अडचण झाली आहे.

ज्यांना महिन्याचा कोठा आला आहे, त्यांना तो द्यावाच लागतो. तो न मिळाल्यास ग्राहक तक्रारी करतात. मात्र, पुरवठा विभागाने धान्य वितरण करताना येणाऱ्या त्रुटीही विचारात घेतल्या पाहिजे, अशी मागणी दुकानदारांकडून होत आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यावर अजूनही लस उपलब्ध नाही. संपर्क टाळणे एवढाच उपाय त्यांवर सध्यातरी उपलब्ध आहे. त्यातच रेशनिंग घेण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्या वेळी अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. अनेक जण एकाच मशिनवर अंगठे देत असल्याने त्यांनाही कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याची धास्ती दुकानदारांनी घेतली आहे. त्यामुळे दुकानदारांनी आता त्यांचाच ठसा घेऊन धान्य वाटपास परवानगी द्यावी, अशी मागणी पुरवठा विभागाकडे केली आहे. ती न मिळाल्यास धान्य वाटप बंद करण्याचाही इशारा दुकानदार संघटनांनी दिला आहे. 

कमिशनचा प्रश्न प्रलंबित 

स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य विक्रीच्या बदल्यामध्ये कमिशन दिले जाते. मात्र, कोरोना काळात दुकानदारांनी जिवावर उदार होऊन धान्य वाटप करूनही त्यांना या कमिशनपासून अद्याप वंचितच राहावे लागलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक कुऱ्हाड आली आहे. त्यामुळे ते कमिशन तातडीने 
धान्य दुकादारांना द्यावे, अशी मागणी धान्य दुकानदारांनी केली आहे. 


""कोरोना काळात रेशनिंग दुकानदारांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्याचा शासनाने विचार करण्याची गरज आहे. पुरवठा विभागाने कोरोना काळात दुकानदारांच्याच अंगठ्याचा ठसा घेतला पाहिजे.'' 

- अशोकराव पाटील, 
जिल्हाध्यक्ष, ऑल महाराष्ट्र शॉपकिपर फेडरेशन संलग्न दुकानदार संघटना 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT