satara sakal
सातारा

सातारा : लोहमार्ग दुहेरीकरणाने संजयनगरवासीय बेघर

८० कुटुंबांच्या जिवाला घोर, वरिष्ठ पातळीवर तोडगा

सकाळ वृत्तसेवा

रेठरे बुद्रुक : भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना संजयनगर (शेरे) येथे शासनाने कायमच्या निवासाची सोय केली. १९७० पासून या कुटुंबांचे तेथे वास्तव्य आहे. हातावरील कामातून ही कुटुंबे गुजराण करतात. याच ग्रामस्थांना रेल्वे हद्दीच्या समस्येने ग्रासले आहे. जवळच्या शेणोली रेल्वे स्थानकाजवळ लोहमार्ग दुहेरीकरण कामात रेल्वे विभागाने संजयनगर वसाहतीच्या जवळून हद्दीचा दावा केला आहे. त्यामुळे अनेकजण बेघर होण्याच्या भीतीने अस्वस्थ आहेत.

संजयनगरमधील रेल्वे हद्दीच्या समस्येतून निर्माण झालेल्या संभ्रमामुळे स्थानिक ग्रामस्थ गेल्या तीन ते चार वर्षांपासून अस्वस्थ आहेत. या विषयावर अनेकदा पाठपुरावा झाला आहे. दुसऱ्या बाजूला रेल्वे हद्दीच्या विषयावर स्थानिक ग्रामस्थांमध्ये मत-मतांतरे आहेत. त्यामुळे हा प्रश्न ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. या विषयाची मांडणी अनेक वेळा केली आहे. तरीही न्याय मिळाला नाही. या कालावधीत तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासमोर हा विषय मांडण्यात आला आहे. अनेक अधिकारी बदलून गेले. परंतु, रेल्वे हद्दीचा प्रश्न मात्र आहे तसाचआहे.

आमदार, खासदार, पालकमंत्री, महसूलमंत्री, रेल्वेमंत्री यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करण्यात आला. आंदोलने, बेमुदत उपोषणे करण्यात आली. तज्‍ज्ञ वकिलांचा सल्लाही ग्रामस्थांनी घेतला. परंतु, रेल्वे हद्दीचा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. त्यामुळे तेथील अनेक कुटुंबे अस्वस्थ आहेत. त्याच्यापुढे निवाऱ्याचा मोठा प्रश्न उभा आहे. त्यावर आता वरिष्ठ स्तरावरच तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रेल्वेच्या हद्दीच्या दाव्याने या वसाहतीतील कुटुंबे अस्वस्थ आहेत. कधी विस्थापित होऊ, याची तेथील रहिवाशांना भीती आहे. रेल्वे विभागाची संजयनगरमधील हद्दीत ८० घरांवर टांगती तलवार आहे. एका बाजूला भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना शासनाने हक्काची घरे दिली. त्यावेळेस शासकीय भूखंड आरक्षित करत मजुरांना घरे देण्यात आली. त्याच जागेवर आजमितीला रेल्वे हक्क सांगत असल्याने द्विधा अवस्था झाली आहे.

रेल्वे हद्दीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. रेल्वे हद्दीची समस्या व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. तेथील कोणाचेही नुकसान होऊ नये, विषय भरकटू नये, यासाठी एकजुटीची आवश्यकता आहे, अन्यथा सर्वांचेच नुकसान होणार आहे.

-संतोष सातपुते,ग्रामस्थ, संजयनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT