

Sanjay Raut Tweet Eknath Shinde shivsena
esakal
Uddhav Thackeray : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज (ता. ६) सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी होणार आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांचा दाखला देत शिंदे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, आजच्या सुनावणीपूर्वी खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह सूचक पोस्ट करत राजकीय वातावरण आणखी तापवले आहे.