सातारा

इथे तपासणी करा; औषधांची गॅरंटी नाही

सकाळ वृत्तसेवा

सातारा : राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या आयुष विभागाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्णत: दुर्लक्ष झाले असून, अगदी साध्या-साध्या औषधांचा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना आवश्‍यक ती सर्व औषधे उपलब्ध
होत नाहीत. सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या विभागाच्या सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. 


केंद्र शासनाने प्राचीन आरोग्य सेवांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळावा, यासाठी आयुष विभागाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. 2009 मध्ये आघाडी शासनाच्या काळात जिल्हा रुग्णालयात आयुष विभागाला सुरवात झाली. त्यामध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी व युनानी उपचारपद्धतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून तशा लांब असलेल्या या सुविधा केवळ केसपेपरच्या खर्चामध्ये उपलब्ध होऊ लागल्या. आज सुमारे 150 ते 200 रुग्ण बाह्यरुग्ण विभागात या सुविधांचा लाभ घेत आहेत. 

भाजप सरकारच्या काळात या विभागाकडे अधिक लक्ष देण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी या सरकारने स्वतंत्र आयुष मंत्रालयाचीही स्थापना केलेली आहे. त्या माध्यमातून केवळ बाह्यरुग्ण विभाग असलेल्या आयुष्य विभागात आंतररुग्ण
(रुग्ण दाखल करून उपचार करण्याची) सुविधाही सुरू करण्याचे धोरण शासनाने घेतले आहे. परंतु, शासनाच्या या भूमिका साताऱ्यासाठी फोल ठरत असल्याचे चित्र आहे. 

जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक तज्ज्ञ आरोग्य सुविधांसाठी येत असतात. त्यामुळे जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयामधील आयुष विभागातील सुविधांचाही लाभ घेता येतो. त्यामुळे आयुष्य
विभागात विविध व्याधींनीग्रस्त असलेले नागरिक अनेक वर्षांपासून उपचार घेत आहेत. परंतु, जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांची नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात, अशी भूमिका दिसत नाही. गेले अनेक महिने या विभागातील औषधांच्या साठ्याकडे कोणाचे लक्ष नाही.

त्यातच कोरोनाची साथ सुरू झाली. त्यामुळे या विभागाकडे दुर्लक्ष करायला अधिकाऱ्यांना आयती संधी मिळाल्यासारखे झाले आहे. सध्या या विभागांतर्गत येणाऱ्या आर्युर्वेद, युनानी व होमिओपॅथी या उपचारपद्धतीच्या बहुतांश औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना एखाद्या आजारासाठी आवश्‍यक असलेली सर्व प्रकारची औषधे एकत्रित मिळत नाहीत. अर्ध्या औषधांवरच समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे औषधे मिळण्याच्या अपेक्षेने लांबून येणाऱ्या नागरिकांची परवड होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT