Smashan Bhumi Sakal
सातारा

दलित समाजातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे? भालवडीत वाद

भालवडी (ता. माण) हे गाव स्मशानभूमीपासून वंचित आहे. त्यामुळे मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे यावरून वाद निर्माण होतात.

विशाल गुंजवटे

बिजवडी : भालवडी (ता. माण) हे गाव स्मशानभूमीपासून वंचित आहे. त्यामुळे मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे यावरून वाद निर्माण होतात. आज दलित समाजातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे, यावरून स्थानिक प्रशासन व दलित समाजाचा वाद झाला. शेवटी ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार करायचे, असा निर्णय दलित समाजाने घेतल्यानंतर पोलिसांसह महसूल प्रशासनाने या गावाकडे धाव घेतली. त्यानंतर चार तासांने त्या मृत व्यक्तीवर ओढ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भालवडी येथील दलित समाजातील विजय प्रकाश पाटोळे (वय ४२) या व्यक्तीचा सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. गावात स्मशानभूमी नाही. या दलित कुटुंबाकडे जमीन नाही. खासगी शेतमालक अंत्यसंस्कारासाठी विरोध करतात. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे, असा प्रश्न दलित समाजासमोर होता. दलित समाजाने हा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडे धाव घेतली; परंतु स्थानिक प्रशासनाकडून त्यांना सहकार्य मिळाले नाही.

जागा उपलब्ध करून देणे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य असताना त्यांनी हात झटकल्याने शेवटी दलित समाजाने ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र वाद उफाळून आला. शेवटी पोलिस व महसूल प्रशासनाला गावात यावे लागले. त्यांनी यावर तात्पुरता मार्ग काढत ओढ्यालगत एका ठिकाणी जागा उपलब्ध करून देत अंत्यसंस्कार करण्यासाठी विनंती केली. त्यानंतर दलित समाजाने त्या मृतदेहावर चार तासांनंतर अंत्यसंस्कार केले.

माण पंचायत समितीचे माजी सभापती याच गावातील असून, स्मशानभूमीसाठी त्यांनी ही प्रयत्न केले होते; परंतु स्थानिक राजकारणामुळे गावात स्मशानभूमी होऊ शकली नाही.

भालवडी ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध असूनही राजकीय हेवेदाव्यांमुळे गाव स्मशानभूमीपासून वंचित आहे. स्थानिक प्रशासनाकडून आमच्यावर अन्याय होत असून, मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा दिली जात नाही. जिल्हा व तालुका प्रशासनाने लक्ष देऊन गावात दलित समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारून आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यावा.

- दीपक पाटोळे, ग्रामस्थ भालवडी.

गावासाठी स्मशानभूमीसाठी निधी मंजूर आहे; परंतु जागेअभावी व उपलब्ध जागेच्या वादामुळे आजपर्यंत स्मशानभूमी झाली नाही. आम्ही गायरानमधील जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला आहे. उपलब्ध जागेच्या मोजणीसाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव दिला आहे.

- ज्ञानेश्वर एकळ, ग्रामसेवक भालवडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT