khatav 
सातारा

तारळीचं पाणी आलं, टेंभूचं कधी येणार?

सकाळ वृत्तसेवा

मायणी (जि. सातारा) : टेंभू सिंचन योजनेचे पाणी मायणी तलावात येणार कधी? या उन्हाळ्यात, महिनाभरात, पंधरवड्यात, नाही नाही या आठवड्यात 100 टक्के येईल, असे "तारीख पे तारीख'चे वायदे ऐकत दोन-अडीच वर्षे सरली. आता तारळीचे पाणी मायणी शिवारात खळाळू लागल्याने, तारळीचे आले, टेंभूचे पाणी कधी येणार? या प्रश्‍नासह शेतकरी व नागरिक उलटसुलट चर्चा करीत आहेत. 

टेंभू सिंचन योजनेचा मुख्य कालवा कलेढोण, मायणीच्या सीमावर्ती भागातून जातो. मात्र, तो भाग उपेक्षितच राहिला आहे. कोणत्याही सिंचन योजनेचा लाभ मिळत नसलेल्या त्या उपेक्षित भागाला टेंभूचे पाणी मिळावे, ही अनेक वर्षांची मागणी होती. टंचाईच्या काळात टेंभूच्या पाण्याने मायणी तलाव भरून घेण्यास मान्यता मिळाली. कामासाठी निधीही मिळाला. बंदिस्त पाइपमधून तलावात पाणी आणण्याच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली. कामालाही गतीने सुरुवात झाली. अनेक अडचणींचा सामना करीत काम पूर्णत्वाकडे आले. पुन्हा लॉकडाउनमुळे थांबले. निधी परत गेला. तो परत मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. पावसाळ्यापूर्वी कामे संपवण्याचे शासन आदेश निघताच उर्वरित कामाला सुरुवात झाली. त्यामुळे या उन्हाळ्यात, महिनाभरात, पंधरवड्यात, आठवड्याभरात पाणी येणारच, असे "तारीख पे तारीख'चे वायदे ऐकून शेतकरी घायकुतीला आले. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात मायणीच्या शिवारात तारळी सिंचन योजनेचे पाणी खळाळले. त्यामुळे टेंभूचे पाणी येणार की नाही, कधी येणार, आता काय राहिलय, किती काम बाकी आहे? युतीच्या काळातील काम आघाडी सरकार कसे पूर्ण करणार? आता टंचाई नसल्याने तलाव भरून घेण्यास मान्यता, तरी कशी मिळणार, अशा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, तलाव भरून घेण्याची मागणी शेतकरी व नागरिक करीत आहेत. मात्र, तलावात टेंभूचे पाणी नेमके कधी येणार याबाबत कोणीच ठोस व खात्रीलायक सांगायला तयार नाही. त्यामुळे तूर्त प्रतीक्षा करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. 

टंचाई काळातच तलाव भरून घेण्याचा शासन आदेश असल्याने आता उर्वरित किरकोळ काम जरी पूर्ण झाले, तरी लगेच तलावात पाणी सोडता येणार नाही. त्यासाठी कदाचित पुढील उन्हाळाही उजाडेल. 

- आप्पासाहेब देशमुख, माजी सरपंच, मायणी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकूहल्ला

Omraje Nimbalkar यांना प्रमुखांचा मान, Ranajagjitsinha Patil डावलल्याची चर्चा, भाजपात खळबळ | Dharashiv

Abhishek Sharma: २५ षटकार, १५ चौकार अन् २३३ धावा... अभिषेक शर्माचं वादळी द्विशतक; पाहा Video

IND vs SL: भारतीय संघाला मोठा धक्का! कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह बाहेर, कोण घेणार त्याची जागा?

सप्तपदी, सात वचनं... पण अवघ्या १६८ तासांतच नात्याचा झाला शेवट; जोडप्यानं का घेतला वेगळं होण्याचा निर्णय?

SCROLL FOR NEXT