Satara 
सातारा

शिक्षकदिनापासून "थॅंक्‍स अ टीचर'अभियान : राजेश क्षीरसागर

सुनील शेडगे

सातारा (जि. सातारा) : शिक्षकदिनापासून जिल्ह्यातील शाळांत शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने "थॅंक्‍स अ टीचर' या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी दिली. सहा दिवस चालणाऱ्या या अभियानात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

कोरोनाजन्य परिस्थितीचे आव्हान पेलताना शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यासाठी शिक्षक नवी तंत्रे, कौशल्ये आत्मसात करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मुलांना शिक्षण देत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. आपापल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात जो बदल झाला आहे, तो शब्दरूपाने व्यक्त करण्यासाठी "थॅंक्‍स अ टीचर' हे अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार असल्याचे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. 

फेसबुक हॅंडल-थॅंक्‍स टीचर, ट्विटर-थॅंक्‍स टीचर, इंस्टाग्राम-थॅंक्‍यू टीचर या "सोशल मीडिया'द्वारे ते राबविण्यात येणार आहे. त्यात समाजातील सर्व घटकांचा सहभाग आहे. शिक्षकांच्या विविध उपक्रमांच्या यशोगाथांचे सादरीकरण केंद्र, तालुका तसेच जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे. त्यात शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. वक्तृत्व, निबंध, पोस्टर, घोषवाक्‍य, कविता, प्रेरणा, प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन, अभिवाचन स्पर्धा असे उपक्रम या वेळी राबविले जाणार आहेत. 

शिक्षकदिनाच्या अनुषंगाने विद्यार्थी व पालकांच्यासाठी विविध प्रकारचे विषय देऊन ऑनलाइन वक्तृत्व, निबंध, पोस्टर, घोषवाक्‍य, शब्द घेऊन कविता तयार करणे, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन, अभिवाचन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही श्री. क्षीरसागर यांनी नमूद केले. 


""समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असे शिक्षक येतात, की ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला नवीन वळण मिळते. आयुष्याच्या अशा वळणावर ज्या शिक्षकांनी आपल्यातील आत्मविश्‍वास जागृत करून यश संपादनासाठी प्रोत्साहित केले, आयुष्यात परिवर्तन आणले, अशा शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी हे अभियान आहे.'' 

-राजेश क्षीरसागर, 
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

SCROLL FOR NEXT