Robbery Sakal
सातारा

चाकूच्या धाकाने गोंदवल्यात लूट; रोख रकमेसह दागिन्यांची चोरी

घरात झोपलेल्या लहान मुलीच्या व वडिलांच्या गळ्याला चाकू लावून चार चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले.

सकाळ वृत्तसेवा

गोंदवले : घरात झोपलेल्या लहान मुलीच्या व वडिलांच्या गळ्याला चाकू लावून चार चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना गोंदवले बुद्रुकमध्ये सोमवारी पहाटे घडली. मध्यवस्तीत हा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोंदवले बुद्रुकमधील धाकटे श्रीराम मंदिरासमोर भाडोत्री म्हणून राहात असलेले मिलिंद परशुराम पाटील (मूळ रा. दोडहसुर, जि. बेळगाव) हे गवंडी काम करतात. रात्री घरात कुटुंबासह झोपले असताना पहाटे तीनच्या सुमारास घरात शिरलेल्या चोरट्यांनी लोखंडी कपाट उघडण्याचा प्रयत्न करत होते. या आवाजाने मिलिंद यांच्या पत्नी मयूरी यांना जाग आली. त्या वेळी चार चोरटे पाहून पती, पत्नीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

मात्र, चोरट्यांनी शेजारी झोपलेल्या लहान मुलीच्या गळ्याला चाकू लावला व घरातील पैसे व दागिने देण्याची धमकी दिली. मिलिंद यांच्याही गळ्याला चाकू लावून मयूरी यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी काढून घेतले. कपाटातील १२ हजारांची रोख रक्कम, १४ हजारे १२५ रुपये किमतीचे सोन्याचे मणी व रिंगा, तसेच ५ हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण व चैन असा सुमारे ३१ हजार १२५ रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाले. या घटनेची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक देवानंद तुपे अधिक तपास करत आहेत.

आईची विनवणी

लहान मुलींच्या गळ्याला चाकू लावल्यानंतर आई मयूरी हिने घरातील हवे ते न्या; पण माझ्या मुलीला सोडा अशी विनवणी चोरट्यांना केली. मात्र, चोरट्यांनी आपले काम पूर्ण होईपर्यंत चाकू गळ्यालाच लावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT