निवासी टेंटसह चवदार भोजनही
निवासी टेंटसह चवदार भोजनही  sakal
सातारा

सातारा : पर्यटकांसाठी निवासी टेंटसह चवदार भोजनही

सकाळ वृत्तसेवा

साताऱ्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर वसलेले कोयना जलाशयाकाठी बामणोलीजवळ सावरी हे छोटेसे गाव आहे. गावाजवळच कोयना धरणाचा शिवसागर जलाशय असल्याने गावात व परिसरात पर्यटनाला मोठा वाव आहे. बामणोली, तापोळा, शेंबडी येथील प्रसिद्ध मठ, वासोटा अशी पर्यटन केंद्रे गावानजीक आहेत. या गावातील सुवर्णा शिंदे यांनी पुढाकार घेत २००४ मध्ये गावातील १५ महिलांना सोबत घेऊन श्रीकृपा महिला बचत गटाची स्थापना केली. परिसरात दळणवळणाच्या सोई चांगल्या नव्हत्या.

आरोग्य, शिक्षण, उपजीविका याबाबतही समस्या होत्या. अशा वातावरणात महिला गटाबाबत माहिती मिळाली आणि सुवर्णा शिंदे यांनी पुढाकार घेत गावात गट स्थापनेला सुरुवात केली. महिलांनी छोटे व्यवसाय सुरू केले. परिसरात उपलब्ध नाचणी, तांदळापासून पापड करून त्याची विक्री करण्यावर शिंदेंनी भर दिला. त्यास पर्यटकांकडून मागणी वाढू लागली.

बचत गटातील महिला स्वावलंबी होण्यासाठी फक्त लोणची, पापडात गुंतून पडल्या नाहीत. आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांनीही दूरदृष्टी ठेवली. कोयना जलाशयाकाठच्या सावरी या छोट्या गावातील सुवर्णा शिंदे आणि त्यांच्या श्रीकृपा महिला बचत गटाने ते दाखवून दिले आहे. बामणोली, वासोटा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी निवासी टेंटसह चवदार भोजन व्यवस्था उपलब्ध करून देत त्यांनी पर्यटनवाढीला हातभार लावतानाच उन्नती साधली आहे.

- दिलीपकुमार चिंचकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT